महाराष्ट्रात ह्यावर्षी फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. मागेच खांदेशात अतिवृष्टी मुळे फळबाग पिकांवर रोगाचे आक्रमन झाले आणि त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले. आता हि नवीन घटना सामोरे आली आहे ती विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातून येथील शेतकऱ्यांनी आपल्या संत्राच्या बागा कापण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील पवनी, नंदगाव आणि खंडेश्वर गावातील हि घटना आहे, या तिन्ही गावातील शेतकऱ्यांनी आपल्या संत्राच्या बागा कापत आहेत. शेतकऱ्यांचे म्हणण्यानुसार अतिवृष्टी मुळे त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि त्यांना यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या संत्राच्या बागा कापण्याचे ठरवले आहे. आता संत्री पूर्णत: तयार झाल्या आहेत असे असले तरी सध्या संत्राच्या झाडांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि त्यामुळे संत्रा उत्पादनात कमालीची घट पाहायला मिळत आहे. किडिंच्या आक्रमणामुळे संत्री पूर्णपणे खराब झाली आहेत आणि झाडांवरून पडत आहेत. यामुळे शेतकरी संत्रा पिकाच्या लागवडीसाठी आलेला खर्चही वसूल करू शकत नाहीय. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. एवढे मोठे संकट अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आले असून देखील जिल्ह्यातील कृषी विद्यापीठाकडून कोणतेही मार्गदर्शन मिळत नसल्याने आता शेतकऱ्यांनी निराश होऊन संत्राच्या बागा कापण्याचा निर्णय घेतला आहे.
फळबाग लावणारे शेतकरी सापडलेत चिंतेत
पाऊस चांगला असो की दुष्काळ असो फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाही. यंदाही शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे. यावर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यातील फळ उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत आहेत. कारण यावर्षी शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीचा खर्चही वसूल होणार नाही, अशी चिंताजनक परीस्थिती आहे. संपूर्ण बागेतील फळे कीडिमुळे व रोगामुळे करपत आहेत आणि त्यामुळे फळांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे आणि याचाच परिणाम म्हणुन जिल्ह्यातील शेतकरी फळबागा उपटून टाकण्यावर भर देत आहेत.
अमरावतीच्या एका शेतकऱ्याची व्यथा...
अमरावतीच्या एका शेतकऱ्याच्या संत्रा फळबागेत यावर्षी अतिवृष्टी आणि हवामानातील बदलामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे त्याच्या संत्र्याचा बागेतील संपूर्ण संत्री खराब होत आहेत.
त्या शेतकऱ्याला दरवर्षी रोगामुळे नुकसान होते परंतु यंदा नुकसानीचे प्रमाण अधिक आहे त्यांना यावर्षी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव संजय आवारे असे आहे या शेतकऱ्याच्या डोळ्यात आपली बाग नष्ट होण्याचे दुःख स्पष्ट दिसत होते. संजय यांनी माहिती देतांना सांगितले की, त्यांच्याकडे जवळपास संत्र्याची 500 झाडे होती. संजय यांची संत्र्याची हि बाग जवळपास 15 वर्षे जुनी होती. संजयने हिच आपली 15 वर्षाची जुनी संत्र्याची बाग तोडली आहे. संजयने बोलतांना सांगितलं की, सर्वेक्षण, पंचनामा आणि नुकसान भरपाईची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली होती. मात्र प्रशासन आपल्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे, अशी तक्रार संजय यांनी व्यक्त केली.
Published on: 14 November 2021, 07:27 IST