News

यावर्षी कापसाने भावाच्या बाबतीत असलेले एक एक उच्चांक मोडीत काढले आहेत.शेतकरी राजा रक्ताच पाणी करून राब राब राबतात त्यांना खऱ्या अर्थाने मानसिक समाधान या पांढर्या सोन्याने यावर्षी दिले.

Updated on 25 March, 2022 8:55 PM IST

यावर्षी कापसाने भावाच्या बाबतीत असलेले एक एक उच्चांक मोडीत काढले आहेत.शेतकरी राजा रक्ताच पाणी करून राब राब राबतात त्यांना खऱ्या अर्थाने मानसिक समाधान या पांढर्‍या सोन्याने यावर्षी दिले.

या वर्षी कापसाच्या भावाबाबत विचार केला तर अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती कायमच अग्रस्थानी राहिले आहे. 25 मार्च रोजी म्हणजे आज कापसाला या बाजार समितीत चक्क 12 हजार रुपये विक्रमी भाव मिळाला.त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे. जर आपण अकोट बाजार समितीचा विचार केला तर बाजार समिती केंद्रस्थानी असल्याने मराठवाडा, खानदेश  आणि विदर्भातील बहुसंख्य कापूसया बाजार समितीत विक्रीला येतो. तसेच या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आजच्या भावाने आनंदाचे वातावरण आहे.

नक्की वाचा:साखर कारखान्यांना झटका! साखर कारखान्यांना नाही मिळणार यापुढे थकहमी आणि भागभांडवल - अजित पवार यांची घोषणा

हंगामातील हा सर्वाधिक भाव असून विठ्ठल झटाले यांच्या कापसाला हा भाव मिळाला आहे.या बाजार समितीच्या वैशिष्ट्य म्हणजे, या बाजार समितीत लिलाव पद्धतीने कापसाची खरेदी केली जाते शिवाय व्यापाऱ्यांची व जिनिंगचे संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी येथे होत असते. त्यामुळे खरेदीदार जास्त असल्याने आवक जरी वाढली तरी कपाशीला चांगला दर मिळत आहे. सध्या आवक तुलनेने कमी झालेले आहे. बराचसा माल विकला गेला आहे परंतु कायम नैसर्गिक  संकटांना तोंड देणाऱ्या शेतकरी राजाच्या कपाशीला यावर्षी चांगला भाव मिळाला यातच मोठं समाधान आहे. 

अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती ही विदर्भातील कापसाचे सर्वात मोठी बाजार समिती आहे. अगदी कोरोना काळामध्ये सुद्धा बाजार समितीचे प्रशासक मंडळाने योग्य उपाययोजना केल्यामुळे ही बाजार समिती बंद पडली नाही.

English Summary: in akot market comitee cotton rate reach at 12 thousand rupees per quintal
Published on: 25 March 2022, 08:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)