यावर्षी राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली.तसेच जागतिक बाजारपेठेत देखील कापसाचा तुटवडा जाणवत असल्याने आणि देशांतर्गत मागणीत वाढ झाल्याने यावर्षी कापसाचे भाव कधी नव्हे या प्रमाणात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पांढरे सोने चकाकत असून विदर्भातील अकोला जिल्ह्यातील कापसासाठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ अकोट येथे कापसाचे दर अकरा हजाराचा अगदी उंबरठ्यावर म्हणजे प्रतिक्विंटल दहा हजार सातशे ते दहा हजार आठशे रुपयांपर्यंत पोहोचलाआहे. अकोट बाजार समितीमध्ये गुरुवारी कापसाला दहा हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी दर मिळाला.अकोला जिल्ह्यातपंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानेअगदी शेवटच्या टप्प्यात वेचणीला असलेल्या कापूस पिकाचे नुकसान झाले.
.मजुरांची समस्या असल्याने अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापूस आहे. अकोट बाजार समितीत कापसाला चांगला भाव मिळत असल्याने विदर्भातील शेतकऱ्यांचा ओढा अकोट बाजार समितीकडे वाढताना दिसत आहे.अकोट बाजार समिती वाशिम, खामगाव,बुलढाणा, अमरावती तसेच दर्यापूर येथील कापूस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. महाराष्ट्र सोबतच अकोला जिल्ला देखील अतिवृष्टीमुळेकापूस पिकाला मोठा फटका बसला होता. कापसाचा लागवड खर्च दरवर्षी वाढत असल्याने शेतकऱ्यांनी या वर्षी लागवड कमी केली आहे.
परंतु गेल्या काही वर्षाचा विचार केला तर या वर्षी कापसाला कधी नव्हे एवढा भाव मिळत आहे. भविष्यात देखील कापसाच्या भावात मोठी वाढ होणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. बाजारात कापसाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून दिवसागणिक बाजार समिती कापसाची आवक वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Published on: 29 January 2022, 12:42 IST