News

या वर्षीच्या गळीत हंगामाचा विचार केला तर राज्यातील अहमदनगर विभागांमध्ये 26 साखर कारखाने सुरू असून त्यापैकी केवळ पाच साखर कारखान्यांनी 100% एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे.

Updated on 08 February, 2022 9:16 AM IST

या वर्षीच्या गळीत हंगामाचा विचार केला तर राज्यातील अहमदनगर विभागांमध्ये 26 साखर कारखाने सुरू असून त्यापैकी केवळ पाच साखर कारखान्यांनी 100% एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे.

वास्तविक पाहता उसाची तोड संपल्यानंतर 15 दिवसाच्या आत मध्ये एफ आर पी देणे कारखान्यांना बंधनकारक आहे तरीसुद्धाएफ आर पी थकवली जात असल्याचे चित्र आहे. या विभागातील कारखान्यांचा  विचार केला तर आतापर्यंत एफ आर पी नुसार 1907 कोटी रुपयांपैकी 1542 कोटी 14 रुपये दिली असून अजून सुमारे तीनशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे.

नगर विभागांमध्ये  1 लाख 48 हजार हेक्टर वर  ऊस उपलब्ध असून तुलनेत मागील वर्षापेक्षा अधिक ऊस उपलब्ध असल्याने साखर कारखाने जास्त काळ यावेळेस चालणार आहेत. यावर्षी एक कोटी 80 लाख टनापर्यंत गाळप होण्याचा अंदाज असून सध्या पर्यंत एक कोटीच्या पुढे गाळप झाले आहे. सर्वसाधारणपणे उसाची तोड झाल्यानंतर साखर कारखान्यांकडून पंधरा दिवसात मध्ये एफ आर पी मिळणे  हे बंधनकारक आहे तसा कायदा आहे. मात्र साखर कारखान्यांकडून याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. 

साखर आयुक्तालयाने देखील कोणत्या कारखाने किती टक्के एफ आर पी दिली याची यादी जाहीर केली असून त्यानुसार 26 साखर कारखान्यांपैकी केवळ पाच साखर कारखान्यांनी 100% एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे.

English Summary: in ahemednager divison 26 sugercane factory start but only 5 sugercane factory give 100 percent frp
Published on: 08 February 2022, 09:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)