News

येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका आता काही महिन्यांवर आल्या असल्याने राज्य शासनाने लोकसंख्या किती आहे या प्रमाणामध्ये जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गणांची संख्या वाढवली आहे.

Updated on 09 February, 2022 12:18 PM IST

येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका आता काही महिन्यांवर आल्या असल्याने राज्य शासनाने लोकसंख्या किती आहे या प्रमाणामध्ये जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गणांची संख्या वाढवली आहे.

या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर आत्ता जिल्हा परिषदेचे अहमदनगर जिल्ह्यात गट व पंचायत समितीचे 170 गण झाले आहेत. या गट व गण याचा कच्चा आराखडा आजता 9 रोजी सादर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.कच्चा  आराखड्यानुसार पाथर्डी व अकोले तालुका वगळता उर्वरित 12 तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या दोन गणवाढले आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.अगोदर दोन निवडणुका या2011 च्याजनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येनुसार घेण्यात आल्या.  अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा गेल्या दहा वर्षाचा विचार केला तर ही लोकसंख्या सुमारे साडेपाच लाखानी वाढली असल्याने तसेच कोरोना साथीमुळे जनगणना झालेली नाही अशा परिस्थितीमध्ये लोकसंख्येची एक नैसर्गिक वाढ लक्षात घेऊन राज्य शासनाने जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे गण यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमदनगर जिल्ह्याची सध्याचे गट व गणांची रचना

 2017चा फेब्रुवारीमध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे 73 गट तर पंचायत समितीचे 146 गण होते. जर अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येचा विचार केला तर ती 36 लाख 4 हजार 668 आहे. यामध्ये सरासरी 42 हजार लोकसंख्येसाठी एक जिल्हा परिषदेचा गट आणि एक हजार लोकसंख्येसाठी एक पंचायत समितीचा गण निश्चित करण्याचा धोरणात्मक निर्णय याबाबत झालेला आहे. त्यामध्ये आता बारा गट आणि चोवीस गणांची  नव्याने भर पडली आहे. 

त्यामुळे या नवीन गट आणि गणांच्या  निर्मितीमुळे अगोदर अस्तित्वात असलेल्या गट आणि गणांमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत.अहमदनगर जिल्हा परिषदेचे सर्वात जास्त 85 गट व चौदा पंचायत समित्यांसाठी 170 गण निश्चित करण्यात आले असून एकूण राज्याचा विचार केला तर अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती गण सर्वाधिक राहणार आहेत.

English Summary: in ahemednager district growth in zp block and panchyaat samiti gan
Published on: 09 February 2022, 12:18 IST