News

शेती करण्यासाठी योग्य जमिनी खूप आवश्यक असते जर का जमिनीत दगड गोटे असतील तर त्या जमिनीत शेती करणे खूप कठीण आहे. सध्या आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात माळरान जमिनी आहेत. दगडगोटे असल्यामुळे या जमिनी तश्याच पडीक राहिलेल्या आहेत. परंतु चक्क आता शेतकऱ्यानेच यावर एक तोडगा शोधून काढला आहे. महाराष्ट्र राज्यातील कळंब तालुक्यातील आंदोरा या गावातील शेतकरी विनोद तांबारे यांनी ट्रॅक्टरवर चालणारे एक जुगाड यंत्र बनवले आहे.

Updated on 09 February, 2022 9:23 AM IST

जुगाड यंत्र:-

पडीक शेतजमीन किंवा माळरान मध्ये शेती करताना सर्वात मोठी पहिली अडचण येते ती म्हणजे रानातील सापडणारे दगड आणि गोटे. दगड आणि गोटे यामुळे।बरेच क्षेत्र पडीक आहे. यावर पर्याय म्हणून राज्यातील कळंब तालुक्यातील एका शेतकऱ्याने यावर पर्याय म्हणून जुगाड यंत्र बनवले आहे. या यंत्राच्या मदतीने आपण शेतातील दगडगोटे काही मिनिटांमध्ये गोळा करू शकतो.विनोद यांनी बनवलेल्या या जुगाड यंत्राच्या मदतीने आपण शेतातील दगड-गोटे गोळा करते. या यंत्राच्या मदतीने शेतकरी प्रत्यक्ष दगड वेचणीला सुरवात करता येऊ लागली आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांची सोय झाली शिवाय तांबारे यांच्या शेतीमध्ये सुद्धा बदल झाले आहेत तसेच शेतातील उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ देखील होत आहे.

या यंत्राची किंमत 7लाख 80 हजार रुपये एवढी आहे तसेच हे यंत्र चालवण्यासाठी 60 एच पी ट्रॅक्टर ची आवश्यकता असते. आणि या ट्रॅक्टर ची किंमत ही 9 लाख रुपये एवढी आहे. संपूर्ण यंत्राची किंमत ही 17 लाख रुपये एवढि आहे मध्य प्रदेश राज्यातील निमज येथून आणले आहे. तांबारे यांनी एक एकर क्षेत्रातील दगड धोंडे वेचणीसाठी 2400 रुपये एवढा रेट आकरला आहे.

दगडगोटे वेचणी यंत्र:-

शेतीमध्ये मशागतीसाठी अनेक यंत्राचा वापर केला जातो. सामान्यतः सध्या सर्व अवजारे बाजारात उपलब्ध असल्याने शेती करणे सहज झाले आहे. पडीक जमिनीतील दगड गोटे गोळा करणे सुद्धा जुगाड मशनिमुळे शक्य झाले आहे. रानातील दगड गोटे वेचण्यासाठी मजुरांना जास्त पैसे द्यावे लागतात तसेच त्या जमिनीत पीक चांगले येत नाही आणि पेरलेले बीज लवकर उगवत सुद्धा नाही.

English Summary: In a matter of seconds, the new machine will be able to remove the stones from the waste land. Beneficial to the peasantry
Published on: 09 February 2022, 09:22 IST