यावर्षी कापसाचे उत्पादनात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घट झाल्याने कापसाचे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत. कापसाची मागणी वाढली असून त्या मानाने पुरवठा हा फारच कमी आहे.
त्यामुळे कापसाचे दर वाढ पाहायला मिळत आहे. तसे आता उन्हाळ्याची सुरुवात होईल तेव्हा कॉटनच्या कपड्यांना मागणी वाढेल. त्यामुळे कापड उद्योगांनी कापूस खरेदी सुरू केली असून त्यामुळे बाजारामध्ये कापसाचे दर टिकून आहेत. आता सद्यस्थितीत देशांमध्ये कापसाचे दर हे नऊ हजार पाचशे ते दहा हजार 200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत आहे.
2022 मध्ये ही तेजी राहण्याची शक्यता
भारत आणि अमेरिकेमध्ये देखील कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने पुरवठा कमी राहील.
त्यामुळे कापूस बाजार 2022 मध्येही तेजीत राहण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात कापसाचे दर जवळपास 41 टक्क्यांनी वाढले आहेत. जागतिक कापूस उत्पादन वाढीचा अंदाज 2022 मध्ये असला तरी वापरही वाढला तसेच चीनच्या आयात वाढेल त्यामुळे कापूस बाजारात तेजीचा काळ राहू शकतो असे अमेरिकेतील एका संस्थेने म्हटले आहे. जर कापसाच्या देशांतर्गत उत्पादनाचा विचार केला तर देशांतर्गत उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांकडे कापूस कमी असण्याची शक्यता जिनिंग उद्योगाने देखील व्यक्त केले आहे. तर व्यापाऱ्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशांतर्गत शेतकऱ्यांकडून 20 ते 25 टक्के कापूस शिल्लक असण्याचा अंदाज कापूस व्यापार या कडून व्यक्त केला जातोय.
कापडाला स्थानिक निर्यातीसाठी असलेली मागणी तसेच कापसाची वाढलेली निर्यात यामुळे देशांतर्गत कापूस बाजारात दर टिकून आहेत. त्यामुळे भारतातील कापूस आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस दरात तफावत आहे ती दूर होते त्यात मंगळवारी इंटरनॅशनल कॉटन एक्सचेंज वर कापसाचे व्यवहार एकशे पंचवीस पॉईंट 380 झाले मागील काही दिवसात हे दर माघारी असले तरी टिकून आहेत.
Published on: 11 February 2022, 10:23 IST