सध्या खाद्य तेलाचे दर गगनाला पोचले आहेत. अक्षरशा तेलाचा वापर करणे एक जिकिरीचे होऊन बसले आहे.गेल्या अनेक दिवसापासून तेलाच्या किमतीया वाढलेल्या होत्या.परंतु मध्यंतरीच्या काही काळातकिमती मध्ये थोडासा दिलासा मिळाला होता.
परंतु रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम होऊन अजून तेलाच्या किमती भडकल्या.या युद्धामुळे या दोन्ही देशातून होणारी आयात बंद होती त्यामुळे तेलाच्या किमती परत भडकल्या. परंतु दिलासादायक बातमी म्हणजे तर रशिया मधून6.23 किलो मेट्रिक टन सूर्यफूल तेल घेऊन एक जहाज भारताकडे निघाल्याने लवकरच या देशातून वाहणारे आयात सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.हे जहाज जवळजवळ पंधरा दिवसात भारतीय बंदरात दाखल होण्याची शक्यता आहे. याशिवाय अजून सहा ते सात जहाजे रशियातूनतेल घेउन मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात खाद्यतेलाचे दर कमी होते असे चित्र आहे.
भारतातील सूर्यफूल तेलाची स्थिती
जर आपल्या भारताचा विचार केला तर 80% सूर्यफूल तेलाची आयात ही युक्रेन आणि रशियामधून होत असते. आपल्या देशातील खाद्यतेलाची जी एकूण आयात आहे त्यामध्ये सूर्यफूल तेलाचा वाटा फक्त पंधरा टक्के आहे.आपल्याकडे शेंगदाणा तेल,सोया तेल तसेच पामतेलाचा पुरेसा पुरवठा आहे.त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. जे देश तेलाच्या अधिक उत्पादन करतात अशा देशांशी चर्चा करूनखाद्यतेलाची लवकरात लवकर आयात वाढवता येईल आणि आयात केल्या नंतर बंदरावर खाद्यतेलाच्या मंजुरीसाठी आवश्यक ती पावले उचलता येतील त्यातून पुरवठा कायम राहील
अशी माहिती अखिल भारतीयखाद्यतेल व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी दिली.दिव्य मराठी ने दिलेल्या बातमीनुसार, गुरुवारी जहाज रशियातून निघाले आहे त्यामुळे आयात पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे पुरवठा कमी होणार नाही असेही शंकर ठक्कर यांनीस्पष्ट केले आहे.
Published on: 12 March 2022, 11:55 IST