News

आहारात लसणाचे खूप महत्व आहे. लसणाचा वापर प्रत्येक भाजी मध्ये केला जातो. लसणाचे औषधी गुणधर्म देखील आहे. यामुळे या लसणाला वर्षभर मागणी असते. लसणाची लागवड रब्बी हंगामात केली जाते. भारत आणि चीन हे लसूण पिकवणारे जगातील प्रमुख देश आहेत. लसूण पिकाचा आपल्या देशात फार प्राचीन काळापासून प्रवेश झाला आहे.

Updated on 30 October, 2023 6:12 PM IST

आहारात लसणाचे खूप महत्व आहे. लसणाचा वापर प्रत्येक भाजी मध्ये केला जातो. लसणाचे औषधी गुणधर्म देखील आहे. यामुळे या लसणाला वर्षभर मागणी असते. लसणाची लागवड रब्बी हंगामात केली जाते. भारत आणि चीन हे लसूण पिकवणारे जगातील प्रमुख देश आहेत. लसूण पिकाचा आपल्या देशात फार प्राचीन काळापासून प्रवेश झाला आहे. या पिकाच्या लागवडीत मध्यप्रदेश आघाडीवर असून त्यानंतर ओडिसा, गुजरात आणि महाराष्ट्राचा नंतर लागतो अशा या अधिक नफा देणाऱ्या लसणाच्या उत्पादनात किड व रोगांमुळे नुकसान होते. त्यामुळे वेळीच त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते.

लागवडीचा हंगाम -
लसणाची लागवड रब्बी हंगाम म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात करतात.पण गड्ड्यांच्या वाढीसाठी थंड हवामान आवश्यक असते.

लसूणाच्या काही सुधारित जाती -
गोदावरी, फुले निलिमा, फुले बसवंत, अंग्री फाउंड व्हाईट, यमुना सफेद, जी-२८२, यमुना सफेद-१, यमुना सफेद-२

लसणावरील प्रमुख किडी आणि रोग -
फुलकिडे - हि किडी लसणातील रस शोषुण घेते. हे फुलकिडे मधल्या पोंग्यात राहतात. फुलकिड्यांमुळे लसणावरील बुरशीजन्य रोग वाढतात. लसूण उगवळ्यानंतर किंवा लागवडीपूर्वी फोरेट 10 % दाणेदार कितनाशक हेक्टरी 10 किलो या प्रमाणात टाकावे. उगवणीनंतर 15 दिवसांनी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी.

पिवळा कोळी -
ही किड पानातील रस शोषण करते. या किडीमुळे पानांवरती पांढरे चट्टे पडतात आणि लसणाची वाढ होत नाही. त्यामुळे प्रादुर्भाव दिसू लागताच डायमियोएट 30 ईसी 15 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

जांभळा करपा -
या बुरशीजन्य रोगामुळे पातीवर पिवळसर – जांभळे, काळपट डाग पडतात. प्रादुर्भाव वाढत जाऊन पात करपते. याचे व्यवस्थापन करण्यासाठी मॅन्कोझेब 75 डब्ल्यूपी 30 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

पिवळसर करपा -
पातीवर लहान-लहान पिवळे डाग पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास पाने पिवळसर – तपकिरी होऊन कुरपतात. त्यामुळे लागवडीपूर्वी लसणास कार्बन्डेझिमची बीजप्रक्रिया करावी. फवारणी करण्यासाठी कार्बन्डेझिम 50 डब्ल्यू पी 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

English Summary: Improved cultivars, pest and disease management for garlic cultivation
Published on: 30 October 2023, 06:12 IST