सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळी मोठा पाटबंधारे प्रकल्पास 2013-14 च्या दरसूचीनुसार 1 हजार 610 कोटींच्या प्रस्तावास मंत्रिपरिषद बैठकीत चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे पाटणसह कराड, सातारा, खटाव आणि माण या अवर्षणप्रवण क्षेत्रास सिंचनासाठी लाभ होणार आहे.
तारळी प्रकल्पांतर्गत पाटण तालुक्यातील डांगिष्टेवाडी येथे तारळी नदीवरील या धरणामुळे खालील बाजूस तारळी नदीवर 8 उपसा सिंचन योजना करुन तारळी खोऱ्यातील 6 हजार 507 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. याव्यतिरिक्त उरमोडी उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्यास शाखा कालवे काढून त्याव्दारे सातारा जिल्ह्यातील खटाव व माण तालुक्यातील एकूण 8 हजार 876 हेक्टर इतक्या अवर्षणप्रवण क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
जलसंपदा विभागाच्या प्रस्तावानुसार 1 हजार 610 कोटींमध्ये 1 हजार 482 कोटी प्रत्यक्ष कामासाठी तर 128 कोटी अनुषंगिक कामांसाठी खर्च करण्यात येतील. या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे प्रकल्पांतर्गत रखडलेले भूसंपादन, पुनर्वसन, कोपर्डे पोहोच कालवा तसेच माण व खटाव कालव्याचे काम पूर्ण होऊन अवर्षण प्रवण क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत झाला असल्याने केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होणार आहे.
Published on: 10 October 2018, 05:41 IST