News

सरकार नेहमीच बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसायासाठी विविध योजना राबवत असत.

Updated on 21 July, 2022 9:21 AM IST

सरकार नेहमीच बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसायासाठी विविध योजना राबवत असत. मग त्या शेतीसाठी (Agriculture) असतात आणि सामान्यांसाठी.राज्यातील मराठा समाजातील आर्थिक मागास प्रवर्गातील बेरोजगार तरुणांना आर्थिक (Financial) पाठबळ देणारा उद्योग व्यवसाय (Industry Business) सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणारे एक महत्त्वाचं महामंडळ म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ होय. याच विकास (Development) महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या काही योजनांच्या

(scheme) संदर्भातील एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. मागच्या काही काळात हे महामंडळ बंद पडल्याप्रमाणे या महामंडळाची अवस्था झाली होती. आता या मंडळाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या काही योजना (Yojana) राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे.परिपत्रक केलं जारीयाचं संदर्भातील 6 जुलै 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण पत्रक जारी करण्यात आलं आहे. प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी आर्थिक समावेश व सदस्य सचिव स्टेट लेवल बँकर्स कमिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हे पत्र लिहिले

आहे.यामध्ये लिहिले आहे की, योजंनामध्ये खेळत्या भाग भांडवलाच्या अंतर्गत कर्ज प्रकरणाचा सीसी व ओडी समावेश करत असल्याबाबत. महोदय उपरोक्त संदर्भातील महामंडळाच्या पत्रानुसार महामंडळाच्या योजना अंतर्गत 4 फेब्रुवारी 2022 पासून मात्र मुदत कर्जावरील व्याज परतावा करण्यात येत आहे.मात्र विविध स्तरावरून प्राप्त झालेल्या निवेदनाचा विचार करता महामंडळाचे योजना अंतर्गत खेळत्या भाग भांडवलांतर्गत सीसी व ओडी घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा महामंडळामार्फत पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

यामध्ये फेब्रुवारी 2022 ते आजतागायत प्रलंबित ठेवण्यात आलेल्या प्रकरणाचा देखील समावेश करण्यात येत आहे. अशी एक महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे.राबवल्या जातात विविध योजना यामुळे मराठा समाजातील आर्थिक मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या महामंडळाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. ज्याअंतर्गत लाभार्थ्याला ट्रॅक्टर खरेदी, वाहन खरेदी किंवा इतर उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली जाते.

English Summary: Important schemes of Annasaheb Patil Corporation have started, 'these' youth will get financial help for the industry
Published on: 21 July 2022, 09:21 IST