मागच्या काही दिवसात अपात्र शिधापत्रिकाधारकांना रेशनकार्ड सरेंडर (Ration Card Surrender) करावे लागले. असा दावा अनेक बातम्यांमध्ये करण्यात येत होता. मात्र यानंतर यूपीच्या योगी सरकारने (Yogi Government) असा कोणताही नियम केला नसल्याचे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
मोफत रेशनचा लाभ फक्त गरजूंनाच मिळणार आहे. यूपी सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, शिधापत्रिकांच्या यादीतून अपात्र लोकांची नावे वगळली जातील आणि आता फक्त गरजूंनाच मोफत रेशनचा लाभ मिळणार आहे.
हे ही वाचा
मोठी बातमी! पशुपालकांसाठी घरपोच पशुरुग्ण सेवा; 'या' टोल फ्री क्रमांकावर साधा संपर्क
आता नवीन लोकांनी रेशनकार्डसाठी (Ration Card) अर्ज केल्यास तपासणीत अपात्र आढळलेल्यांची शिधापत्रिका रद्द केली जात आहेत. रद्द झालेल्या अपात्र लोकांच्या ओळखपत्रांवरच नवीन गरजू पात्रांना रेशन योजनेचा (scheme) लाभ दिला जात आहे. सन 2011 च्या लोकसंख्येच्या गुणोत्तराच्या आधारे राष्ट्रीय अन्नसुरक्षेमध्ये नावे जोडली जात आहेत. 2011 च्या तुलनेत 2022 मध्ये शहराची लोकसंख्या दुप्पट झाली आहे.
हे ही वाचा
शेतकऱ्यांचे अच्छे दिन! फ्लॉवरच्या 'या' वाणाच्या लागवडीतून शेतकरी घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न
कोरोनाची प्रकरणे (Corona cases) वाढल्यामुळे 2021 ची जनगणना होऊ शकली नाही. या स्थितीत राष्ट्रीय अन्नसुरक्षेसाठी लोकसंख्येचे प्रमाण वाढवणे गरजेचे बनले आहे. त्या आधारे शहरी गरिबांना योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा स्थितीत राज्यातील जिल्हा पुरवठा कार्यालय (District Supply Office) आणि तहसील स्तरावरील पुरवठा कार्यालयात येणारे नवीन रेशनकार्डचे अर्ज सादर केले जातात. त्यानंतर तपासाच्या आधारे अपात्रांच्या शिधापत्रिका रद्द करून त्यांच्या जागी पात्रांच्या शिधापत्रिका बनविल्या जातात.
महत्वाच्या बातम्या
राजू शेट्टी ॲक्शन मोडमध्ये; उसाप्रमाणे दुधाला हमीभाव जाहीर करावा, नाहीतर...
मोठी बातमी! 5 वर्षात विमा कंपन्यांनी तब्बल 40,000 कोटींची केली कमाई
Organic Fertilizers: अवघ्या 18 दिवसात शेतकऱ्यांचे जीवन बदलेल; 'या' सेंद्रिय खताची होतेय चर्चा
Published on: 23 July 2022, 04:07 IST