लवकरच कृषी सारथी माती परीक्षण मोहीम हाती घेत आहे. शेतकऱ्यांचा अवाजवी खर्चाची बचत व्हावी आणि मातीसुध्दा पुढील पिढीसाठी सुपीक राहावी यासाठी प्रयत्न म्हणून हा उपक्रम आम्ही हाती घेत आहोत. कृषी सारथी ची टीम येत्या १५ तारखेपासून प्रत्येक गावात मीटिंग घेऊन, नमुना कसा घ्यायचा याचे प्रशिक्षण देणार आहे.
माती परिक्षणाची गरज आणि फायदे समजून सांगणार आहे तुमच्या गावातील सर्व नमुने एका ठिकाणी जमा केल्यानंतर ते बुलडाणा ला घेऊन जाऊन माती परीक्षण अहवाल तुम्हाला घरपोच आणून देणार आहे. वर्षभर त्या माती परीक्षण अहवाल नुसारच खते, कीटकनाशके बियाणे यांचे नियोजन कसे करता येईल याचं मार्गदर्शन करणार आहे.
अखेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत सरकारला आली जाग! मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
रिपोर्ट्स हे एकदम ओरिजनल आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेल्या निकषानुसार असतील, कारण हा कुठल्या योजनेसाठी नाही तर शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवत असलेला उपक्रम आहे. आम्ही बुलडाणा जिल्ह्यातील १०० गावात हि मोहीम राबवत आहे, आम्हाला तुम्ही कॉल करून बोलावले तर आपले गाव प्रथम विचारात घेतले जाईल त्यासाठी मी आमचे संपर्क क्रमांक सोबत पाठवत आहे.
कृषी सारथी
9604246581/7620835899
एरंडीची लागवड आहे खूपच फायदेशीर, दुर्मिळ होत असताना मिळेल फायदा
आजपर्यंत शेती आणि शेतकरी वर्गासाठी अभ्यासपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन दिलं नाही, मार्गदर्शन भेटलं तर योग्य संसाधन उपलब्ध झाल नाही, तेच मिळावं हाच कृषी सारथी चा प्रयत्न आहे. कृषी सारथी मध्ये सर्व लोक हे सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत. मुंबई, पुणे, बंगलोर, दिल्ली, भारतातच नव्हे तर काही विदेशात सुद्धा काम करतात पण शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व लोक आपल्या परीने कृषी सारथी च्या माध्यमातून शेतकरी वर्गाला होईल ती मदत करत आहेत.
कोथिंबिरीचे भाव पडले, शेतकऱ्याने काळजावर दगड ठेवून फिरवला रोटर
केळीचे दर अजून वाढणार! बाजारपेठेत केळीची मागणी वाढल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात.
किसान सभेचे लाल वादळ मुंबईत धडकणार! शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक
Published on: 14 March 2023, 11:05 IST