News

गेल्या २ दिवसापासून मान्सून संबंधी मीडियातील बातम्या अशी माहिती पसरवत आहे कि, मे च्या २ऱ्या आठवड्यात बं उपसागारात येऊ शकणारे चक्रीवादळमुळे मान्सून लवकर येईल .

Updated on 08 May, 2022 11:22 AM IST

मे महिन्याच्या मध्यावर किंवा शेवटी भारतीय समुद्रात तयार होणारे च. वादळे मान्सून आगमनावर नक्कीच सकारात्मक किंवा कधी नकारात्मक परिणाम करत असतात. याचे मागील वर्षी आलेले 'तौक्ते' व ' यास ' ह्या दोन वादळवरून आली.

सध्या 'इसीएमडब्लूएफ' व आयएमडीच्या च. वादळ बातमीचा प्रेडिक्शनचा आधार घेऊन लवकर मान्सून आगमनासंबंधी बातम्या मीडियाकडून दिल्या जात आहे.खरं तर अजुन च. वादळ निर्मिती, त्याचे मार्गक्रमण व कालावधी इ संबधी सध्या फक्त शक्यता वर्तवली आहे.

प्रत्यक्षात काय घडेल, हे येणारा काळच सांगू शकेल . त्यातही मान्सून आगमनाच्या घडामोडी भारतीय समुद्रात मे महिन्याच्या शेवटी घडून येतात. तर च. वादळ निर्मिती शक्यता ८-९ मे ला बं उपसागारात जाणवते. ह्या दोन प्रक्रियाची कालावधी साजेशी सांगड होणे व मान्सून करंट खेचण्यासाठी घडून येणे आवश्यक आहे. हे सर्व जर तर च्या कंगोऱ्यावर अवलंबून आहे. 

तेंव्हा तोपर्यंत ग्रामीण भाषेतील मराठी म्हणीप्रमाणे ' म्हैस पाण्यात अन बाहेर मोल ' असेच मान्सून आगमनसंबंधी सध्या बोलले जात आहे, असे वाटते. असे माझे वैयक्तिक मत आहे.एक खुलासा! 

 

माणिकराव खुळे, Meteorologist (Retd.), IMD Pune. ह. मु. वडांगळी ता. सिन्नर, जि. नाशिक.

English Summary: Important news regarding the arrival of monsoon
Published on: 08 May 2022, 11:22 IST