१.नागरीकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी : पालकमंत्री धनंजय मुंडे
२.खाद्य तेलाचे भाव कमी होण्याची शक्यता, सरकारने घेतला मोठा निर्णय
३.राज्यात गारठा होतोय कमी,हवामानाचा विभाग अंदाज
४.पशुधनाचे युनिक टॅगिंग करून करता येणार ऑनलाइन नोंदणी
५.पीएम किसान सन्मान निधी योजनेत वाढ होण्याची शक्यता
१.नागरीकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी : धनंजय मुंडे
बीड जिल्ह्यातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हयातील पाणी आरक्षण संदर्भातील बैठकीत दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी आरक्षण संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते..या वर्षी जिल्हयात दुष्काळ सदुश्य परीस्थित आहे.१५ जुलै पर्यंत पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार नाही,यादृष्टीने नियोजन करण्यात येईल. याबैठकीस जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, उपमुख्यकार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंखे, निवासी उप जिल्हाधिकारी शिव कुमार स्वामी यांच्यासह संबधित विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
२.खाद्य तेलाचे भाव कमी होण्याची शक्यता, सरकारने घेतला मोठा निर्णय
गृहिणीसाठी आनंदाची बातमी स्वयंपाकाच्या तेलाच्या किमती घसरण्याची शक्यता आहे .कारण केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने तेल कंपन्यांना पत्र देऊन आंतरराष्ट्रीय दरानुसार तेलाच्या किमती कमी करण्याची विनंती केली त्यामुळे देशात तेलाच्या किमती वाढण्याची शक्यताय..खाद्यतेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता टाळण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलत आहे. सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात करण्याच्या निर्णयाची डिसेंबरमध्ये मुदत वाढवली आहे. आता खाद्यतेलावरील कमी केलेले आयात शुल्क मार्च २०२५ लागु करण्याची शक्यता आहे.महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. खाद्यतेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता टाळण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
३.राज्यात गारठा होतोय कमी,हवामानाचा विभाग अंदाज
राज्यात किमान तापमानात वाढ होणार आहे.सद्या ५ अंशांखाली घसरलेले तापमान पुन्हा ७ अंशांच्या वर गेले आहे.किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी होत आहे. आजराज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानात किमान तापमान ६ ते ८ अंशांदरम्यान आहे.उत्तर भारतात धुके, थंडीची लाट, थंड दिवस ही स्थिती आजूनही कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढू लागले असले तरी हुडहुडी कायम आहे.राज्यात किमान तापमानाचा पारा १० ते २१ अंशांच्या दरम्यान आहे. मागील चार दिवसांपासून विदर्भातील नागरिकांना हुडहुडी भरली असून तापमानाचा पारा घसरला आहे.नागपूरात आज १०.४ अंश तापमानाची नोंद झाली.वाशिम जिल्ह्यात आज १०.३ अंश तापमान होते.आज किमान तापमानात वाढ होत गारठा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
४.पशुधनाचे युनिक टॅगिंग करून करता येणार ऑनलाइन नोंदणी
गेल्या काही महिन्यांपासून दुधाचे दर कमी झाले असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य भर मोठ्या प्रमाणात आंदोलन पुकारले होते यावर तोडगा काढत शासनाने दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. ५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूधपुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले आहे. या योजनेचा कालावधी ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी आहे.त्यात जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सह आयुक्त डॉ. बी. आर. नरवाडे यांनी केले.या योजनेपासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये यासाठी.ज्या पशुंच्या कानामध्ये इअर टॅग लावण्यात आलेले आहेत व त्यांची ऑनलाइन नोंदणी ‘भारत पशुधन पोर्टल’वर करण्यात आली आहे.अशाच दुधाळ गाईंसाठी शासनाचे अनुदान देय असणार आहे, त्यामुळे सर्व पशुपालकांना पशुधनाचे युनिक इअर टॅगिंग करून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
५.पीएम किसान सन्मान निधी योजनेत वाढ होण्याची शक्यता
पीएम किसान सन्मान निधी योजनेत घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे.एका अहवालानुसार, मोदी सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दुप्पट करण्याची शक्यता आहे सध्या शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये मिळतात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. केंद्र सरकार दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत आहे. या अंतरिम बजेटमध्ये यामध्ये आर्थिक तरतूद करुन वार्षिक १२००० रुपये लाभ देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार केंद्र सरकार, पीएम किसान सन्मान निधी योजनेत वाढ करण्याची तयारी करत आहे. केंद्र सरकार २००० रुपयांचे चार हप्ते जमा करू शकते. किंवा ३००० रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारीत आहे.तर महिला शेतकऱ्यांच्या खात्यात १२००० रूपये देऊ शकते.
Published on: 28 January 2024, 03:33 IST