सध्याच्या स्थितीला बाजारपेठेत सोयाबीन ला प्रति क्विंटल ६ ते ७ हजार रुपये असा दर आहे. देशातील उद्योगधंद्यांना सोयाबीन ची मोठ्या प्रमाणात गरज असल्यामुळे बाजारात सध्या सोयाबीन ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बाजारपेठेचे सूत्र आहे जर मागणी मोठ्या प्रमाणात असेल तर दरामध्ये घट होते मात्र सोयाबीन च्या बाबतीत अजून असे काय घडले नाही जे की बाजारात मोठी मागणी असल्यामुळे दर तर स्थित आहेत. सर्वात जास्त सोयाबीनचे उत्पादन ब्राझील तसेच अर्जेंटिना या देशात घेतले जाते. जे की याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेतील सोयाबीन वर होणार की दर वाढणार असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात आहे.
सोयाबीनचे दर वाढणार? पहा काय म्हणतात तज्ञ:
बाजारात सध्यातरी सोयाबीन चे दर ६ ते ७ हजार आहेत. पण कालच्या बाजारामध्ये सोयाबीन चे दर पाहिले तर काही बाजार समित्यांमधे सोयाबीनच्या दराने चांगलीच उसळी मारलेली आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव बाजार समितीमध्ये कालच्या दिवशी सोयाबीनला सर्वात जास्त दर मिळाला आहे. पुलगाव बाजार समितीमध्ये काल सोयाबीन ला सर्वात जास्त म्हणजे 6910 रुपये दर मिळाला आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून सोयाबीन ला बाजरपेठेत ६ ते ६५०० असा दर मिळत होता. पण काल भेटलेल्या दरामुळे असे वाटत आहे की इथून पुढे सोयाबीन च्या दरात चांगली वाढ होईल. कारण ज्या देशात सोयाबीनचे जास्त उत्पादन निघतेय त्या देशातील सोयाबीन ची स्थिती चांगली नाही आणि देशात उद्योगांना सोयाबीन ची गरज भासत असल्यामुळे बाजारात सोयाबीन ची मागणी वाढत आहे. बाजारात सोयाबीन ची मागणी वाढतेय म्हणल्यावर दर तर उसळी खाणारच आहेत असे तज्ञ लोकांनी सांगितले.
सोयाबीन कधी विकायचं?
शेतकऱ्यांनी आपल्या आवश्यकतेनुसार सोयाबीन बाजारात विकायला काढले आहे, यामध्ये काही अडचण च नाही पण येईल त्या काळामध्ये सोयाबीन च्या दरात सुधारणा होऊ शकेल मात्र जेवढा दर पाहिजे तेवढ्या प्रमाणत भेटेल की नाही हे सांगू शकत नाही. सध्या बाजारात सोयाबीन ला सहा ते साडे सहा हजार प्रति क्विंटल असा दर मिळत आहे जो की चांगला दर असल्याने शेतकऱ्यांनी स्वतः सोयाबीन बाबतीत निर्णय घेतला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना सध्या पैशांची टंचाई भासत नाहीये त्यांनी लगेच सोयाबीन विक्रीला काढले नाही तरी चालेल. कारण येईल त्या काळामध्ये सोयाबीन च्या दरात थोड्या का प्रमाणत व वाढ होईल असा अंदाज कृषी तज्ञांनी व्यक्त केलेला आहे.
सोयाबीनमुळे शेतकऱ्यांची सुधारेल अर्थिक स्थिती :-
बाजारात सध्या सोयाबीन ला सहा ते साडे सहा हजार प्रति क्विंटल ने दर भेटत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जे की ज्या शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे त्या शेतकऱ्यांनी जरी सोयाबीन विकायला काढले तरी हरकत नाही कारण चांगल्या प्रमाणत सोयाबीन ला भाव चालू आहेत त्यामुळे पैशांची अडचण दूर होईल आणि फायदा सुद्धा होईल. पण ज्या शेतकऱ्यांना लगेच पैशाची गरज नाही त्यांनी सोयाबीन विक्री करण्यास नाही काढले तरी चालेल कारण येईल त्या काळामध्ये सोयाबीन चे थोड्या प्रमाणात दर वाढतील असा अंदाज आहे तर शेतकऱ्यांची अर्थिक स्थिती सुधारेल.
Published on: 23 February 2022, 05:53 IST