भारताची राजधानी दिल्ली सोबतच उत्तर भारतातील राज्यात कडाकीच्या थंडी सुटलेली आहे जे की अशा परिस्थितीत भारताच्या हवामान खाते विभागाने शेतकऱ्यांना मोठा इशारा दिलेला आहे. देशातील अनेक भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शविला आहे. बुधवार पर्यंत तमिळनाडू च्या किनारी भागात पाऊस पडण्याचे अंदाज सांगितले आहेत तसेच चेन्नई आणि त्या लगतच्या जिल्ह्यात सुद्धा समोवरी आणि मंगळवारी पावसाचा अंदाज लावलेला आहे. येईल या १-२ दिवसामध्ये तिरुवल्लूर जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असे सांगण्यात आले आहे.
चेन्नई मध्ये घसरला तापमानाचा पारा :-
चेन्नई मधील अनेक भागात पाऊस झाल्यानंतर तापमानात पारा घसरला जे की किमान तापमान २२.७ अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरले. पुद्दुचेरी तसेच उत्तर किनारपट्टी मधील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असे सांगण्यात आले आहे. चेन्नई मधील हवामानशास्त्र विभागाचे उपसंचालक बालचंद्रन यांनी सांगितले की मंगळवारी राज्यातील काही भागात पाऊस पडेल. पश्चिमेकडील वाहत्या वाऱ्यांमुळे राज्यात पाऊस चालू आहे असे त्यांनी सांगितले आहे.
पुढील दोन दिवसात या भागात पाऊसाची शक्यता :-
आंध्रप्रदेश मध्ये पुढील दोन दिवसात किनारपट्टी भागात पाऊसाची दाट शक्यता आहे तसेच पूर्व मध्य विदर्भ, छत्तीसगड आणि तेलंगणा मधील काही भागात सुद्धा पाऊसाची दाट शक्यता आहे. पुढील काही तासात महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायलसीमा, तामिळनाडू आणि केरळ मध्ये सुद्धा पुढील ४-५ दिवसात पाऊस पडेल. याव्यतिरिक्त ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागात सुद्धा हवामान खात्याने पाऊस पडण्याचा अंदाज पडेल असे सांगितले आहे.
जम्मू काश्मीर आणि इतर भागात धुक्याची चादर :-
पुढील दोन दिवसांमध्ये दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब, चंदिगढ आणि राजस्थान राज्यातील काही भागांमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याला उदभवली आहे. तसेच पुढील काही दिवसात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये सकाळी व रात्री दाट धुके पडेल असे सांगण्यात आले आहे.
Published on: 19 January 2022, 05:03 IST