देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सध्या सर्व उद्योगधंदे सावरत आहेत. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांना कंपन्यांकडून ८.१३ ते १० टक्क्यांहून अधिक पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. असे एका संस्थेने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. मागील दोन वर्षाहून अधिक काळ कोरोनाने थैमान घातले होते. त्यातच अनेक उद्योग धंदे बंद पडले होते तर काही उद्योगांना मोठा तोटा झाला होता त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली होती तर काहींना पगार कपातीचा फटका बसला होता.
परंतु आता कोरोना परीस्थिती पूर्वपदावर आलील आहे त्यामुळे पुन्हा एकदा पगारवाढ मिळण्याची शकयता आहे. टीमलीजच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी द जॉब्स आणि सॅलरी प्राइमर अहवालानुसार, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते. पण वाढ मर्यादित राहील, असे अहवालात म्हटले आहे.
या अहवालात १७ राज्यांतील ९ प्रमुख शहरांमधील २ लाख ६३ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन विचारात घेतले आहे. अहवालात १७ क्षेत्रांचा समावेश आहे. यापैकी १४ क्षेत्रांमध्ये, १० टक्क्यांपेक्षा कमी वेतनवाढ अपेक्षित आहे.
सरासरी वाढ ८.१३ असण्याचा अंदाज आहे. सध्या वेतनवाढ १० टक्क्यांपेक्षा कमी आहे; पण चांगली बातमी अशी आहे की वजावटीची वर्षे संपली आहेत. टीमलीज सर्व्हिसेसच्या सह-संस्थापक रितुपर्णा चक्रवर्ती यांनी सांगितले की, उद्योगाच्या विविध क्षेत्रांतून वाढत्या मागणीमुळे तसेच वाढ कोरोना पूर्वपदावर येत आहे त्यामुळे वेतन वाढ वाढण्याची शक्यात आहे.
महत्वाच्या बातम्या
बळीराजाचा सन्मान..! महाराष्ट्र पर्यटन व कृषी पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन
Published on: 13 May 2022, 11:10 IST