News

कोबीचा वापर फास्ट फूड, सॅलड आणि भाजी म्हणून केला जातो, त्यामळे भारतात कोबीला प्रचंड मागणी आहे. कोबीची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. कोबी ही हिरवी आणि जांभळ्या रंगाची वनस्पती आहे, जी वर्षभर उगवता येते. पण भारतात कोबीचे पीक मुख्यत: हिवाळ्यात घेतले जाते.

Updated on 30 September, 2023 6:08 PM IST

कोबीचा वापर फास्ट फूड, सॅलड आणि भाजी म्हणून केला जातो, त्यामळे भारतात कोबीला प्रचंड मागणी आहे. कोबीची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. कोबी ही हिरवी आणि जांभळ्या रंगाची वनस्पती आहे, जी वर्षभर उगवता येते. पण भारतात कोबीचे पीक मुख्यत: हिवाळ्यात घेतले जाते. कोबीमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपुर प्रमाणात असते. याशिवाय, त्यात फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम आणि लोह सारखी खनिजे देखील मुबलक प्रमाणात असतात. कोबीची लागवड वर्षभर करता येत असली, तरी कोबी पेरण्याचा सर्वोत्तम काळ सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान असतो. जातींनुसार कोबी 2.5 ते 3 महिन्‍यात तयार होते, तयार गड्डा हातास टणक लागतो.

कोबीच्या सुधारित जाती-
गोल्डन एकर, पुसा मुक्ता, पुसा ड्रमहेड, के-१, प्राइड ऑफ इंडिया, कोपन हेगन, गंगा, पुसा सिंथेटिक, श्रीगणेश गोल, हरियाणा, कावेरी, बजरंग, मिड सीझन मार्केट, सप्टेंबर अर्ली, अर्ली ड्रम हेड, लेट लार्ज ड्रम हेड, K1 इत्यादी कोबीच्या लोकप्रिय जाती आहेत.
कोबीसाठी जमीन -
कोबीसाठी सर्वप्रथम शेताची नांगरणी करून माती भुसभुशीत करावी. यानंतर शेताची ३ ते ४ वेळा नांगरणी करून माती समतल करुन कुजलेले शेण शेतात टाकावे. यानंतर आणखी एक नांगरणी करावी, जेणेकरून शेण मातीत चांगले मिसळेल.

कोबी पिकावरील कीड व व्यवस्थापन-
1. डायमंड बैक मोथ - ही कोबी पिकातील गंभीर कीड आहे. ही कीड पृष्ठभागाच्या पानांच्या खाली अंडी घालतात. शरीरावर केस असलेल्या हिरव्या रंगाच्या अळ्या पाने खातात आणि छिद्र करतात. योग्य नियंत्रण उपायांचा अभाव असल्यास, ही कीड पिकाचे 80-90% पर्यंत नुकसान करु शकते. या कीडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किफन 30 मिली , कोराजन - 5 मिली या कीडनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
2. मावा- ही कीड कोबीच्या पानांचा रस शोषून घेते त्यामुळे पाने पिवळी पडतात व उत्पादनात घट होते. या कीडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कॉन्फिडोर - 10 मिली , सुपर डी - 30 मिली या कीडनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
3. ब्लॅक रॉट / घाण्या रोग - कोबीवर्गीय पिकांवरील हा एक घातक रोग आहे. कोबीच्या पानांच्या कडांवर V आकाराचे ठिपके आलेले दिसतात. पान पिवळे पडण्यास सुरुवात होते व हळूहळू हे ठिपके झाडांवर सर्वत्र पसरू लागतात. रोपाच्या अन्नद्रव्य वाहिन्यांमध्ये या जिवाणूंची वाढ होते परिणामी रोपाची पाने, खोड व मुळे काळी पडतात व रोगग्रस्त होऊन झाड सडून जाते. या जिवाणूंवर नियंत्रण मिळवण्यासाठी धानुकोप 30 ग्राम + ओमाइसिन 30 मिली या बुरशीनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

English Summary: Important information about cabbage crop cultivation, pests and management!
Published on: 30 September 2023, 06:08 IST