News

Maharashtra: महाराष्ट्रातील मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नैसर्गिक संकट, दुबार पेरणी, कर्ज अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. पावसाळी अधिवेशनातही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकरी आत्महत्येवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated on 24 August, 2022 11:12 AM IST

Maharashtra: महाराष्ट्रातील मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नैसर्गिक संकट, दुबार पेरणी, कर्ज अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या (farmers) आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. पावसाळी अधिवेशनातही विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेतकरी आत्महत्येवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांना भावनिक पत्र लिहीत आत्महत्या न करण्याचे आव्हान केले आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्याच असल्याचे त्यांनी या पत्रात म्हंटले आहे. तसेच शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना सरकार राबवेल असेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

यंदा मान्सूनचा (Monsoon Rain) पाऊस वेळेवर दाखल झाला मात्र मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिके जमीनदोस्त (loss of agriculture) झाली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी आशा लावून शेतकरी बसला आहे. विरोधाकांच्या सततच्या मागण्यांमुळे शिंदे सरकारने अधिवेशनात शेती क्षेत्राशी संबंधित काही महत्वाचे निर्णय केले आहेत.

Sanen Goat: जास्त दूध उत्पादनासाठी सानेन शेळी ठरतेय अव्वल; पालनातून शेतकऱ्यांना मिळणार चांगले उत्पादन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिवेशनातील निर्णय

हवामान केंद्र वाढणार

अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी हवामान खात्याविषयी निर्णय घेतला आहे. हवामान विषयक मोजमाप करण्यासाठी संख्या अपुरी असल्यामुळे त्याच्या संख्येत वाढ करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

यापूर्वी महाराष्ट्रात २४०० महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहे. याचीच संख्या वाढवणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांना अचूक माहिती मिळणार मिळेल.

पंचनाम्यासाठी मोबाईल ॲप

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकट तसेच दुबार पेरणीला सामोरे जावे लागत आहे. नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे लवकरात लवकर व्हावे यासाठी मोबाईल ॲप सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येईल.

Weekly Horoscope: हा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा ठरेल? वाचा तुमचे राशीभविष्य

गोगलगायीने पिकांच्या नुकसान भरपाईचे आश्वासन

यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनके संकटांना सामोरे जावे लागत आहे. मान्सून पूर्व पिकांची पेरणी झालेल्या पिकांवर अनेक रोग घोगावात आहे. तसेच सोयाबीन पिकावर यलो मोझॅक सारखे रोग आल्यामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. तसेच गोगलगायीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे लवकरच भरपाई मिळण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले आहे.

पीक नुकसानीच्या विमा कंपन्यांना लेखी सूचना

यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक विमा कंपन्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. कृषि कार्यालय, तहसिल कार्यालय किंवा ज्या बँकेत विमा भरलेला आहे अशा ठिकाणी नुकसानीची सूचना/अर्ज स्वीकारले जातील व हे अर्ज ग्राह्य धरले जातील अशा लेखी सूचना विमा कंपन्यांना देण्यात येतील.

शेतीसाठी आधुनिकीकरण

शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी आजच्या युगात आधुनिकीकरणाची गरज बनली आहे. डिजिटल शेती अभियानामध्ये बियाणांची ट्रेसेबिलिटी, ब्लॉक चेन मॉडेल, आर्टिफिशियल इन्टलिजन्स, को-ऑपरेटीव्ह सोसायटी व किसान उत्पादक समूहांच (FPO) संगणकीकरण इत्यादी कार्ये हाती घेतली जातील असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या:
Gold Rate: सोन्या चांदीचे नवीन दर जाहीर! 4700 रुपयांनी स्वस्त खरेदी करा सोने; तपासा नवे दर...
Weather Update: पावसाने तोडले 29 वर्षाचे रेकॉर्ड; यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस

English Summary: Important decisions of Shinde government for farmers
Published on: 24 August 2022, 11:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)