News

सध्या संपूर्ण देशात शेतकरी बांधव खरीप हंगामासाठी आवश्यक पूर्वमशागत करिता लगबग करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. आगामी काही दिवसात खरीप हंगामासाठी पेरणीची सुरुवात शेतकऱ्यांकडून होणार आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सल्ला जारी केला आहे. राज्यात खरीप हंगामात सर्वाधिक कापूस आणि सोयाबीन लागवड केली जाते.

Updated on 26 April, 2022 3:08 PM IST

सध्या संपूर्ण देशात शेतकरी बांधव खरीप हंगामासाठी आवश्यक पूर्वमशागत करिता लगबग करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. आगामी काही दिवसात खरीप हंगामासाठी पेरणीची सुरुवात शेतकऱ्यांकडून होणार आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सल्ला जारी केला आहे. राज्यात खरीप हंगामात सर्वाधिक कापूस आणि सोयाबीन लागवड केली जाते.

यामुळे कृषी विभागाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. कृषी विभागाच्या मते शेतकरी बांधवांनी मागील दोन वर्षांत खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे चालू वर्षी बियाणे म्हणून पेरणीसाठी वापरावे. असे आवाहन कृषी विभागाने शेतकरी बांधवांना केले आहे. याशिवाय कृषी विभागाने सांगितले की, ग्रामबीजोत्पादन, पीक प्रात्याक्षिके योजनेंतर्गत आलेल्या उत्पादनातून बियाण्यांची निवड करावी यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे यावेळी सांगितले जात आहे.

हेही वाचा : शेतकऱ्याचा नांदखुळा कार्यक्रम!! कुलरची हवा देऊन अवलिया शेतकऱ्याने उत्पादित केले जरबेरा फुल 

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सोयाबीन हे एक स्वपरागसिंचित पीक आहे. म्हणजेच सोयाबीन पिकाचे सर्वच वाण सरळ वाण असतात. यामुळे दरवर्षी सोयाबीन बियाणे बदलाची आवश्यकता नसते.

एकदाचं सोयाबीन बियाणं प्रमाणित झालं की त्या बियान्याच्या माध्यमातून किंवा उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षांपर्यंत वापरात येते. शिवाय यामुळे शेतकऱ्यांचा पैसा देखील वाचतो. यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरात असलेले सोयाबीन बियाणे वापरावे असा सल्ला दिला गेला आहे. मात्र सोयाबीन बियाणे प्रमाणित असावे म्हणजेच या बियान्यापासून शेतकऱ्याने याआधी लागवड केलेली असावी आणि त्यापासून त्यांना चांगले उत्पादन देखील मिळाले असावे.

हेही वाचा : Sugarcane Farming : ऊसाचे क्षेत्र असेच वाढत राहिले तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागेल : नितीन गडकरी

शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बियाणे हे अत्यंत नाजूक असते. या बियाण्याचे बाह्य आवरण पातळ असल्याने या बियाणाला हाताळताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषता बीजप्रक्रिया करताना काळजी घ्यावी.

सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घेण्याचा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोक नेहमीच देत असतात. बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये अन्यथा सोयाबीन बियाण्याच्या उगवणक्षमतावर परिणाम होऊ शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे बियाणे साठवुन ठेवण्यासाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर करू नये.

बियाणे साठवताना त्याची थप्पी 7 फुटांपेक्षा जास्त उंच असणार नाही, याची काळजी घ्यावी. बियाणे होताळताना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अन्यथा सोयाबीन बियाणे उगवणार नाही आणि यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो.

हेही वाचा : Custerd Apple Variety : भारतातील सर्वात जास्त उत्पादन देणाऱ्या सीताफळच्या जाती ; वाचा याविषयी

कृषी विभागाने शेतकरी बांधवांना सल्ला देताना सांगितले की, शेतकरी बांधवांनी टोकन पद्धतीने किंवा प्लॅटरचा वापर करून सोयाबीन पेरणी करावी यामुळे प्रति हेक्टरी 20 किलो बियाणे कमी लागते.

टोकन पद्धतीने किंवा प्लॅटरचा वापर केला तर हेक्‍टरी 50 ते 55 किलो बियाणे आवश्‍यक असते. सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता 70 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे.

शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. असा सल्ला यावेळी कृषी विभागाने दिला आहे. निश्चितच कृषी विभागाचा हा सल्ला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा फायद्याचा ठरणार आहे आणि आगामी खरीप हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकापासून चांगले उत्पादन प्राप्त होईल.

हेही वाचा : Small Business Idea 2022 : 50 हजारात सुरु करा 'हा' व्यवसाय ; होणार अल्प कालावधीत श्रीमंत

English Summary: Important advice from agriculture department रे .. !! Be careful when buying soybean seeds during kharif season
Published on: 26 April 2022, 03:08 IST