News

अहमदनगर : शेतकर्‍यांना शाश्‍वत उत्पन्न मिळण्यासाठी व शेतीचा विकास साधण्यासाठी महाराष्ट्रात ठिंबक शिवधनराई योजना राबविण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

Updated on 25 August, 2020 8:55 PM IST


अहमदनगर : शेतकर्‍यांना शाश्‍वत उत्पन्न मिळण्यासाठी व शेतीचा विकास साधण्यासाठी महाराष्ट्रात ठिबक शिवधनराई योजना राबविण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

गेल्या २० वर्षात महाराष्ट्रातील अनेक शेतकर्‍यांनी शेती परवडत नसल्याने पीके घेणे सोडून दिले आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात जमिनी पडीत होत चालल्या आहेत. तर अनेकांनी निसर्गाचा लहरीपणा व कर्जबाजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. राज्य सरकारने ठिंबक शिवधनराई योजनेचा अवलंब केल्यास मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना लाभ मिळणार असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

वर्षभर पाणी वाया न घालवता शेतकर्‍यांनी कमी पाणी लागणारे पिके घेऊन ठिंबक पध्दतीचा अवलंब करावा, ठिंबक सिंचनसाठी सरकारने शेतकर्‍यांना ९० टक्के सबसिडी द्यावी, शेताच्या बांधावर वन औषधी झाडे लावण्यासाठी सरकारने रोपे व लावलेल्या रोपांच्या देखभालीसाठी मनरेगा योजनेतंर्गत खर्च देण्याची तरतुद या योजनेत आहे.

English Summary: Implement drip Shivdhanrai scheme in Maharashtra
Published on: 25 August 2020, 08:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)