1. बातम्या

महाराष्ट्रात ठिंबक शिवधनराई योजना राबवा


अहमदनगर : शेतकर्‍यांना शाश्‍वत उत्पन्न मिळण्यासाठी व शेतीचा विकास साधण्यासाठी महाराष्ट्रात ठिबक शिवधनराई योजना राबविण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

गेल्या २० वर्षात महाराष्ट्रातील अनेक शेतकर्‍यांनी शेती परवडत नसल्याने पीके घेणे सोडून दिले आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात जमिनी पडीत होत चालल्या आहेत. तर अनेकांनी निसर्गाचा लहरीपणा व कर्जबाजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. राज्य सरकारने ठिंबक शिवधनराई योजनेचा अवलंब केल्यास मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना लाभ मिळणार असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

वर्षभर पाणी वाया न घालवता शेतकर्‍यांनी कमी पाणी लागणारे पिके घेऊन ठिंबक पध्दतीचा अवलंब करावा, ठिंबक सिंचनसाठी सरकारने शेतकर्‍यांना ९० टक्के सबसिडी द्यावी, शेताच्या बांधावर वन औषधी झाडे लावण्यासाठी सरकारने रोपे व लावलेल्या रोपांच्या देखभालीसाठी मनरेगा योजनेतंर्गत खर्च देण्याची तरतुद या योजनेत आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters