जर भारताचा विचार केला तर संपूर्ण देशाला होणाऱ्या लिंबूच्या एकूण पुरवठा पैकी 40 टक्के पुरवठा हा इल्लूर बाजारपेठेतून होतो.
त्यापाठोपाठ तिरुपती जिल्ह्यातील गुंडूर येथून व उर्वरित पुरवठा हा राजमुंद्री व तेलानी बाजारातून होतो. इल्लूर बाजारपेठेत जवळजवळ वीस हजार नोंदणीकृत लिंबू उत्पादक शेतकरी आहेत. सध्या लिंबू च्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून जर तुम्हाला एक लिंबू खरेदी करायचा असेल तर त्यासाठी 10 ते काही ठिकाणी वीस रुपये देखील मोजावे लागत आहेत. बदलत्या हवामानाचा तसेच अवकाळी चा फटका लिंबू उत्पादनावर बसल्याने लिंबू उत्पादनात देखील घट आलेली आहे.
त्यामुळे मागणीच्या मानाने तसेच प्रचंड उखाडा असल्याने लिंबूचे मागणी प्रचंड वाढली आहे परंतु उत्पादनात घट झाल्याने त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने दर हे गगनाला पोहोचत आहेत.
देशातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या इल्लूर येथे केवळ पाच ट्रक म्हणजे पाच पट कमी पुरवठा या वर्षी होत आहे. यामागील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मागच्या दोन वर्षात कोरोना काळात लिंबू उत्पादकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. तसेच शेतकरी आर्थिक अडचणीमुळे वेळेवर औषध फवारणी व खताचा पुरवठा करू शकले नाहीत. त्यातल्या त्यात मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये आलेल्या पावसाने मोठे नुकसान केले. त्यामुळे लिंबू उत्पादनात घट आली आहे. एक ट्रक लिंबू पूर्वी पाच लाखांमध्ये मिळत होता परंतु तोच ट्रक आता 31 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भारतामधील लिंबू उत्पादनाचा विचार केला तर आंध्र प्रदेश राज्यात जास्त प्रमाणात लिंबूचे उत्पादन घेतले जाते. कारण आंध्र प्रदेश राज्याची माती लिंबू साठी उत्तम आहेत.
लिंबाला वारंवार पाणी देण्याची गरज राहत नाही.
लागवड केल्यानंतर तीन ते चार वर्षांमध्ये लिंबू उत्पादन सुरू होते व पुढील पाच वर्षापर्यंत फक्त खत आणि पाण्याचे व्यवस्थापन केले तर उत्पादन मिळत राहते. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या जो काही लिंबू बाजारात दाखल होत आहे त्याचा दर्जा हवा तेवढा चांगला नाही कारण जास्त भाव असल्याने नफा पटकन मिळावा यासाठी शेतकरी पूर्णपणे लिंबू पक्व न होऊ देता कच्ची निंबू बाजारपेठेत आणत आहेत. परंतु पुरवठा फारच कमी असल्याने मागणी आहे त्यामुळे असे कच्ची नींबू देखील विकले जात आहेत.(स्त्रोत-दिव्य मराठी)
Published on: 11 April 2022, 12:38 IST