रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे येत्या खरीप हंगामात खताची टंचाई प्रकर्षाने जाणवू शकते. खत टंचाईचा मुद्दा चालू रब्बी हंगामात देखील मोठ्या चर्चेचा विषय होता. आता या युद्धामुळे खताची आयात प्रभावित होणार असल्याने परत एकदा खत टंचाईचा मुद्दा बांधा पासून ते दिल्लीपर्यंत चांगलाच गाजू शकतो.
यामुळे मोदी सरकार देखील देशांतर्गत खताचे उत्पादन वाढवण्याकडे अग्रेसर होत असल्याचे सांगितले जातं आहे. यादरम्यान, प्रमुख खत निर्माती कंपनी इफको देखील देशात चार नवीन नॅनो युरिया प्लांट उभारणार असल्याची माहिती समोर येत आहे. इफको चार नवीन नॅनो युरिया प्लांट लावणार आहे खरी मात्र यामुळे नेहमीच प्रकर्षाने जाणवत असलेली खत टंचाई दूर होईल का हा मोठा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.
इफकोचे अध्यक्ष दिलीप संघांनी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांची बुधवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान यांना नॅनो युरियाचा फायदा सांगितला तसेच इफकोचे भविष्यातील उपक्रमाबद्दल देखील मोदींना अवगत केले.
इफको आगामी काळात चार नॅनो युरिया प्लांट उभारणार हे यावेळी स्पष्ट करण्यात आले. संघांनी यांनी नॅनो युरियाचे फायदे पंतप्रधान यांना सांगितले तसेच नॅनो युरिया भारतासमवेतच इतर देशात मोठे लोकप्रिय झाले असल्याचे नमूद केले.
नॅनो युरिया पर्यावरणास पूरक असल्याने तसेच वाहतुकीसाठी सोयीस्कर असल्याने शेतकऱ्यांना विशेष लाभदायक ठरत आहे. संघांनी यांनी सांगितले की, नॅनो युरिया भविष्यात मोठ्या प्रमाणात वापरला जाईल तसेच आगामी काळात याचे चार प्लांट उभारले जातील.
नॅनो युरियाची मागणी पूर्ण करण्यासाठी आगामी काही काळात नॅनो युरियाचे पाच प्लांट आपल्याला देशात बघायला मिळतील. फुलपूर, आमला, परद्विप आणि बंगलोर मध्ये नॅनो युरियाचे चार प्लांट उभारले जाणार आहेत. सध्या कलोल (गुजरात) येथे नॅनो युरियाचा प्लांट अस्तित्वात आहे. नॅनो युरियाने आतापर्यंत 2 कोटी बाटल्या तयार केल्या आहेत. भविष्यात याचे प्रोडक्शन अजून वाढेल त्यामुळे खत टंचाई वर यामुळे कदाचित तोडगा काढला जाऊ शकतो.
संबंधित बातम्या:-
महत्वाचे! खरीप हंगामात खतांचा तुडवडा भासणार, म्हणुन आताच करा 'हा' उपाय; नाहीतर………!
कांद्याचा भाव तब्बल दीड हजारांनी घसरला! कांदा उत्पादक शेतकरी सापडला पुन्हा अडचणीत
Published on: 18 March 2022, 09:21 IST