खतांचे उत्पादन घेणारे जगातील सर्वात मोठी सहकारी संस्था इफको(IFFCO) ने नॅनो तंत्रज्ञानावर आधारित (nano technology) नॅनो नायट्रोजन, नॅनो जिंक आणि नॅनो कॉपर तयार केले आहे. देशभरात याचे मोठ्या प्रमाणात चाचणी घेतली जात होती. विशेष म्हणजे या चाचणीत चांगले परिणाम दिसू आले आहेत. याविषयीची बातमी झी बिझीनेसने दिली आहे.
आता शेतकरी शेतात ज्या प्रमाणात खतांचा (Chemical fertilisers) वापर करतात. त्यातुलनेने नॅनो उत्पादानाने Nano nitrogen, Zinc and Copper ने याचे कमी प्रमाण लागेल आणि उत्पन्नात वाढ होईल असा दावा इफको कडून करण्यात आला आहे. इफकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उदयशंकर अवस्थी यांच्या मते, गुजरातच्या कलोलमध्ये इफको प्लांटमध्ये नॅनो नायट्रोजन, नॅनो जिंक आणि नॅनो कॉपर तयार करण्यात आले आहे. या तिन्ही उत्पादनातून माती, शेतकरी आणि पर्यावरणाला फायदा होईल आणि नेहमी वापरण्यात येणाऱ्या खतांच्या वापरात ५० टक्क्यांची कमी येणार आहे. यामुळे शेतीवरील खर्च कमी येणार आहे.
इफको गाजियाबाद आणि गौतमबुद्ध नगर जिल्ह्याचे मुख्य कार्यक्षेत व्यवस्थापक बृजवीर सिंह यांनी सांगितले की, इफकोने भारतातील पहिले नॅनो नायट्रोजन तयार केले आहे. हे युरियाच्या पर्यायात वापरले जाऊ शकते. नायट्रोजनच्या योग्य पद्धतीने वापरल्यास हे युरियाचा वापर ५० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. नॅनो जिंकला जिंक खतांच्या पर्यायात बनविण्यात आले आहे. नॅनो जिंकचे वापर केल्यानंतर जिंकचे पूर्ण प्रमाण पिकांना मिळणार. यामुळे पिकाचे जिंक ग्रहण करण्याची क्षमता वाढेल आणि याचा परिणाम हा पीक उत्पन्नावर होईल. तिसरे उत्पादन नॅनो कॉपर आहे, जे पिकांना पोषण आणि सुरक्षा दोघांसाठी मदत करते. हे पिकांना मारक ठरलेल्या कीटकांशी लढण्यास पिकांना ताकद देत असते. पिकांचे ग्रोथ हारमोन झपाट्याने वाढते. नॅनो कॉपर कृषी रसायनाच्या रुपाने वापरावे लागते. पूर्ण देशात या नॅनो उत्पादनांची ११ हजार वेळा चाचण्या करण्यात आली. हे सर्व चाचण्या ICAR आणि कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली झाले आहेत. याच्या वापराने पिकांच्या उत्पन्नात ६ ते २० टक्के वाढ होईल.
Published on: 18 May 2020, 01:50 IST