शेतकरी शेतीमध्ये वेगळ्या प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करताना दिसतात.रासायनिक खत निर्मिती मध्ये वेगवेगळ्या कंपन्या सध्या बाजारात आहेत. त्यामध्ये इफको ही एक नामांकित कंपनी आहे.या कंपनीने आजपर्यंत अनेक दर्जेदार रासायनिक खतांचा पुरवठा शेतकऱ्यांना केलेला आहे.
अशातच शेतकऱ्यांच्या सेवार्थ इफकोनेसागरिका नावाचे सेंद्रिय खत तयार केले आहे. या लेखात आपण सागरिका या सेंद्रिय खताबद्दल माहिती घेऊ.
नेमके काय आहे सागरिका सेंद्रिय खत?
इफकोने असे सेंद्रिय खत तयार केले आहे,यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादनआणि मातीचे गुणवत्ता दोन्ही वाढवता येतील व टिकवताहीयेतील. सागरिका सेंद्रिय खते समुद्री शैवाल पासून तयार केले जाते. म्हणून त्याला सागरिका असे नाव देण्यात आले आहे.
अशा पद्धतीने करू शकता वापर
कंपनीने जमिनीची सुपीकता टिकावी तसेच पिकांची गुणवत्ता डोळ्यासमोर ठेवून या सेंद्रिय खताचा वापर सोपा केला आहे.
250 मली द्रव्य सागरिका सेंद्रिय खत एक लिटर पाण्यात विरघळवून तुम्ही संपूर्ण एक एकर शेतात फवारणी करू शकतात.तसेच घन स्वरूपात असलेल्या सागरिका सेंद्रिय खताचा वापर तुम्ही एक एकर जमिनीसाठी आठ किलो पर्यंत घेऊन त्याचा वापर करू शकता.
कंदवर्गीय भाजीपाला पिकासाठी उपयुक्त
शेतकऱ्यांनी जर सागरिका सेंद्रिय खताची फवारणी भाजीपाला वर्गीय पिकावर केली तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. कांदा, बटाटा आणि लसूण सारख्या कंदवर्गीय भाज्यांसाठी या सेंद्रिय खताचा वापर करून शेतकरी चांगला नफा कमवू शकतात. सागरी काही सेंद्रिय खत बनवणाऱ्या ऍक्वाग्रीचे व्यवस्थापकीय संचालक अभिराम सेठ यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही सेवालाल पासून कॉस्मेटिक आणि इतर गोष्टींमध्ये वापरण्यात येणारी उत्पादने तयार करायचो. ती शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर आहेत.
त्यानंतर शैवालपासून सागरिका बनवण्याचे काम सुरू केलं.
सागरिका सेंद्रिय खताची किंमत
इफको या कंपनीने दोन वर्ष संशोधन करून सागरिका तयार केले आहे. यामध्ये विशेष असे की सागरिका आहे 100 टक्के सेंद्रिय खत आहे. कंपनीने सागरिका हे द्रव्य आणि घण अशा दोन्ही स्वरूपात मार्केटमध्ये आणले आहे. कंपनी नुसार एक लिटर द्रव्य बाटलीची किंमत पाचशे रुपये आहे आणि घन स्वरूपात दहा किलो सेंद्रिय खताची किंमत 415 रुपये आहे.(संदर्भ- हॅलो कृषी)
Published on: 23 November 2021, 12:41 IST