News

शेतकरी चांगले उत्पादन घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक खतांचा उपयोग करतात. ज्यामध्ये एनपीके खत समाविष्ट आहे. हे खत पिकांसाठी फार फायदेशीर मानले जाते.कारण या द्वारे पिकांना पूर्ण पोषक तत्त्वे मिळतात.

Updated on 10 October, 2021 11:18 AM IST

 शेतकरी चांगले उत्पादन घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक खतांचा उपयोग करतात. ज्यामध्ये एनपीके खत समाविष्ट आहे. हे खत पिकांसाठी फार फायदेशीर मानले जाते.कारण या द्वारे पिकांना पूर्ण पोषक तत्त्वे मिळतात.

.या खतांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम चे मिश्रण असते. यामुळे लागणारे घटक पिकांना मिळतात. शेतकऱ्याचा रब्बी हंगामाची तयारी करीत आहेत. परंतु मध्येच शेतकऱ्यांना एक मोठा झटका बसलाय.

इफकोया कंपनीने पिके खतांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या वाढीव किंमती मुळे बऱ्याच नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे

अशा पद्धतीने झाली वाढ

इफकोखताच्या एका गोणी मागे शंभर रुपयांची वाढ केली आहे. शेतकऱ्यांना 50 किलो ची एक बॅग एक हजार पन्नास रुपयांपर्यंत मिळत होती.ती आता अकराशे पन्नास रुपयांना मिळेल. शेतकऱ्यांसाठी ही भाव वाढ  चिंताजनक आहे. अगोदर शेतकरी झालेल्या पावसामुळे चिंताग्रस्त आहे. त्यामध्ये झालेली ही भाववाढ शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखाप्रकार आहे.शेतकऱ्यांचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत शेती आहे.

त्यामुळे खतांच्या किमती शेतकऱ्यांसाठी खूपच प्रभावित करू शकतात. या वाढत्या किमतींनी शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या उभी केली आहे.

एम पी के खतांमधून मिळतात हे पोषकतत्वे

 एनपीके खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असते. या घटकांमुळे पिकांना लागणारे पोषक तत्वे उपलब्ध होतात. या खताच्या वापराने पिकांचे उत्पादन देखील चांगले येते.

English Summary: iffco fertilizer growth price of 100 rupees per bag
Published on: 10 October 2021, 11:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)