शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असते तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते यामधील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना. जर शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे झाले तर त्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजनाचा लाभ घेता येईल. लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना विमा काढणे आवश्यक आहे आणि त्यासाठी ३१ डिसेंम्बर २०२१ पर्यंतच वेळ आहे.
जर शेतकऱ्यांनी मुदत संपायच्या आधी म्हणजेच ३१ डिसेंम्बर २०२१ च्या आधी जर विमा काढला नाही तर नैसर्गिकरित्या झालेल्या नुकसानाची आर्थिक मुदत भेटणार नाही. जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरकारने शेकऱ्यांना ३१ डिसेंम्बर २०२१ पर्यंतचा वेळ दिलेला आहे. २०२१-२१, २०२१-२२ तसेच २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आलेली आहेत.
पीक विम्याचा हप्ता किती असेल?
शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकाला नैसर्गिक आपत्ती तसेच इतर कोणत्या कारणांचा धोका झाला तर या योजनेचा लाभ घेता येईल. प्रधानमंत्री फसल विमा योजना चा लाभ घेण्यासाठी भारत सरकारच्या वेबसाईटवर जाऊन नोंद करावी लागणार आहे. रब्बी पिकातील गहू, बार्ली,मसूर तसेच मोहरी या पिकांसाठी १.५ टक्के तर बटाटा पिकासाठी ५ टक्के असा दर निश्चित केला गेला आहे.
नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी काय करावे?
ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते त्यावेळी संस्था, संबंधित बँक शाखा तसेच कृषी संबंधित विभागाला ७२ तासाच्या आत तिथे जाऊन आढावा घ्यावा लागतो. तसेच मदत घेण्यासाठी तुम्ही १८००-८८९-६८६८ या नंबर वर संपर्क साधावा.
शेतकऱ्यांना 100 रुपयांना 537 रुपये मिळाले:-
पीक नुकसाणीमुळे जो शेतकऱ्यांना आर्थिक धोका बसतो तो कमी करण्यासाठी सरकारने १३ जानेवारी २०१६ रोजी प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू केली होती. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर सांगतात की प्रीमियम म्हणून भरलेल्या १०० रुपये मागे ५३७ रुपये भेटतील. सरकारचा असा दावा आहे की डिसेंम्बर २०२० पर्यंत शेतकऱ्यांनी १९ हजार कोटी रुपयांचा विमा हप्ता भरलेला आहे.
Published on: 16 December 2021, 04:54 IST