सध्या ऑनलाईन लोन देणारे अनेक ॲप्स आहेत. जर तुम्ही सर्च केले तर तुम्हाला खूपच पर्याय दिसतात. कारण आता या सारख्या ॲपची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा ऑनलाईन लोन देणाऱ्या ॲपवर रिझर्व बँक ऑफ इंडियाची कडक नजर असते.
आरबीआयने आधीच 650 ॲप्स बेकायदेशीर घोषित केला असून त्यापैकी शंभर ॲप्स ना प्ले स्टोअर मधून हटवण्यात आला आहे.
याच्या माध्यमातून मिळते तात्काळ कर्ज
जर तुम्हाला झटपट कर्ज हवे असेल तर या ॲपच्या माध्यमातून अवघ्या काही तासांमध्ये कर्ज उपलब्ध होते. यातूनच बँकेतून कर्ज घेण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस तर कधीकधी महिनाभर वाट पाहावी लागते. बँकांच्या तुलनेमध्ये हे डिजिटल कर्ज तात्काळ व सहज मिळते. तसेच एकदम कमीत कमी कागदांचे पूर्तता करावी लागते. डिजिटल ॲपच्या माध्यमातून 15 दिवस ते एक महिन्याचा कालावधी साठी कर्ज मिळते तुम्हाला दहा ते बारा हजाराची जरी गरज असेल तरी तुम्हाला डिजिटल ॲपच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होते. परंतु या माध्यमातून कर्ज घेण्याची प्रक्रिया जरी सोपी आणि सहज असली परंतु जर कर्जाची परतफेड वेळेवर केले नाही तर मोठेच प्रश्न उभे राहू शकतात.
कुठली समस्या उभी राहू शकते?
बऱ्याच जणांना पैशांची गरज तात्काळ असल्याने या डिजिटल ॲपच्या माध्यमातून कर्ज घेतात परंतु लोकांच्या आर्थिक अडचणीचा फायदा सायबर चोरटे येत असल्याचे दिसून येत आहे. कर्ज देऊन ते वसूल करण्याची नवीनच पद्धत यांनी शोधून आणली आहे. या प्रक्रियेमध्ये मोबाईल वर लिंक पाठवून आपली पर्सनल डिटेल्स यामध्ये भरायला सांगितले जाते व त्याद्वारे आपली पर्सनल डिटेल त्यांच्याकडे जाते. काही दिवसानंतर आपल्या या माहितीचा गैरवापर केला जातो व कर्जदारांची बदनामी केली जाते.मोबाईल नंबर तसेच आपल्या फोटोंचा गैरवापर करून आपल्या नातेवाईक व मित्र परिवारांना फोनवर मेसेज करून आपण कसे बदनाम होत असे सांगितले जाते.
एवढेच नाही तर बदनामी टाळण्यासाठी कर्ज मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जास्त पैशांची मागणी केली जाते आणि जर पैसे दिले नाहीत तर बदनामीची भीती दाखवली जाते. त्यामुळे बरेच जण बदनामीच्या भीतीने अवाच्या सव्वा पैसे भरतात. जर घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास उशीर झाला तर व्याजावर व्याज आणि दंड वसूल केला जातो त्यामुळे घेतलेल्या कर्जाची रकमेत वाढ होते. कधी दहा हजार रुपयांचे कर्ज एक लाख रुपयांपर्यंत सुद्धा पोहोचते. जेव्हा आपण हे ॲप डाऊनलोड करतो तेव्हा फेसबुक आणि फोटोगॅलरी ची परवानगी मागितली जाते. याशिवाय हे ॲप डाऊनलोड होत नाही. त्यानंतर या फोटोंचा गैरवापर, मित्र, नातेवाईक तसेच आई-वडील व सासू-सासरे यांच्या फोन नंबर वर मेसेज पाठवले जातात.बऱ्याचदा कर्जदार व्यक्तीला वसुलीसाठी धमक्याचेदेखील फोन येतात.
म्हणून व्हेरिफाईड पोर्टल वर अर्ज करणे महत्त्वाचे
यापासून वाचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सजग राहणेहे होय. असे सायबर गुन्हेगार अधिकृत वेबसाइट सारखी दिसणारी बनावट वेबसाइट तयार करतात व ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी स्वस्त कर्जाचा पर्याय उपलब्ध करून देतात व त्याद्वारे आपली पर्सनल डिटेल्सघेतातत्यानंतर बँकेच्या डिटेल्स घेऊन खात्यातून पैसे लुटले जातात.त्यामुळे आपणया ॲपद्वारे कर्जासाठी अर्ज करणार आहोत ती अधिकृत आहे की नाही हे तपासणे खूपच आवश्यक आहे.त्यासोबत कर्ज ऑफर च्या लिंकवर कधीही क्लिक करू नका.
Published on: 13 March 2022, 01:21 IST