बाजारात बनावट शेतीमालाची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. या मधून अनेक ग्राहकांची फसवणूक होते. फळपिकांमध्ये बनावट शेतीमालाची विक्रीचे प्रमाण जास्त आहे. आंबा फळपिकाबाबत बनावट विक्री होत असल्याचे समोर आले आहे. मुंबई (Mumbai) बाजारपेठेत हापूसच्या नावाखाली अन्य आंब्याचीच विक्री होत आहे.
आतापर्यंत बनावट शेतीमालाची विक्री थांबवण्यासाठी अनेक पर्याय अवलंबले तरी पण हा प्रकार सुरूच आहेच. त्यामुळे पणन संचालकांनी याबाबत कडक धोरण अवलंबले असून आता ‘जीआय’ च्या नावाखाली बनावट शेतीमालाची विक्री (Agricultural goods) करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
एप्रिल महिन्यात 'या' भाज्यांची लागवड करून कमवा लाखोंचा नफा..!
तापमानवाढीमुळे जीव गुदमरतोय; घरात लावा 'ही' झाडे आणि मिळवा थंड हवा
ग्राहकांची फसवणूक टळणार
सध्या आंब्याचा हंगाम सुरु आहे. यामुळे ही कारवाईची भूमिका प्रशासनाला घ्यावी लागली आहे. कारण आंब्याच्या बाबतीमध्येच असे प्रकार घडताना दिसत आहे. आता शेतकरी आणि ग्राहकांची होणारी फसवणूक टळणार आहे.
त्याचबरोबर दर्जेदार मालही ग्राहकांना मिळणार आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित बाजार समित्यांनी ही कारवाई करण्याच्या सूचना पणन संचालकांनी दिल्या आहेत. बाजार समित्यांबरोबर शेती उत्पादक कंपन्या, शेती बचतगट यांनाही सूचना करण्यात आल्या आहेत.
Published on: 04 April 2022, 12:31 IST