ई पीक पाहणी ही राज्य सरकारची महत्त्वाची मोहीम असून यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई पीक पाहणी पोर्टलच्यामदतीने करायची आहे.परंतु या मोहिमेला जवळजवळ दोन महिन्याचा कालावधी पूर्ण झाला. आतापर्यंत जवळजवळ 90 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे.
मध्यंतरी अतिवृष्टी आणि पावसामुळे नोंदणी करणे अवघड झाले होते. म्हणून 14 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. याच दरम्यान शेतकऱ्यांनी वाढीवमुदतीचा फायदा घेतला. परंतु आता रब्बी हंगामाला सुरुवात होत आहे त्यामुळे या हंगामातील पिकांची नोंद होण्याच्या दृष्टीने ही मुदत 30 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे.
ई पीक पाहणी नोंदणी केली नाही तर काय होईल?
या पोर्टलच्या माध्यमातून पिकांची नोंद केली की ती आपोआप सातबारा उतारा वर येणार आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न आहे की काही तांत्रिक अडचणीमुळे पिकांची नोंद केली गेली नाही तर काय होईल. परंतु यामध्ये घाबरण्याचे काही कारण नाही.पिकांची नोंद झाली नाही तरी त्या संबंधित शेतकऱ्याला सरकारी योजनांपासून वंचित ठेवले जाणार नाही.
महसूल किंवा कृषी विभागाचे अधिकारी हे त्या शेतकऱ्यांची पिक पाहणी करणार आहेत. हे ई पीक पाहणी ते पहिलेच वर्ष असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असतील तर घाबरून न जाताई पीक पाहणी अद्यापही केली नसेल तर इतरांच्या मदतीने करता येणार आहे. आता ई पीक पाहणी साठी तलाठी हे शेतकऱ्यांना मदत करणार आहेत.तसेच पिकांची नोंद कशी करायची याचे मार्गदर्शन करणार आहेत.
ई पीक पाहणीचे फायदे
- ईपीकपाहणीॲपमुळेशेतकऱ्यांच्यापिक पेरणी ची अचूक नोंद होणार आहे. त्यामुळे ना शेतकऱ्यांच्या नुकसान होणार आहे ना सरकारचे फसवणूक
- या नोंदीमुळे राज्यात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
- पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येईल. त्यामुळे भविष्यात लागणारे बी बियाणे तसेच लागणारी खते उपलब्ध करून देता येणार आहे. तसेच कोणत्या पिकाचे किती क्षेत्रावर किती उत्पन्न झाले हे देखील अचुक पणे सांगता येईल.
- एका मोबाईल वर जवजवी शेतकऱ्यांचा नोंदणी करता येणार असल्यामुळे एखाद्या शेतकऱ्याकडे मोबाईल नसेल तरी अशा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येणार आहे. अशा शेतकऱ्यांसाठी ही सोय करण्यात आली आहे.( संदर्भ-tv9मराठी)
Published on: 22 October 2021, 04:26 IST