पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच या योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला.
याचा थेट लाभ हा दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांना झाला. परंतु अद्यापही असे बरेच शेतकरी आहेत की ज्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत.जर तुम्हाला ही पैसे आल्याचा मेसेज आला नसेल तर काळजी करण्याचे कारण नसून पी एम किसान पोर्टल वर स्टेटस तपासले असता त्यावर यासंबंधीचे काही मेसेज येत आहेत. असे जे शेतकरी आहेत की ज्यांच्या खात्यावर अद्याप पैसे आलेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी त्यांची हप्त्याची स्टेटस तपासल्यावर कमिंग सून असे लिहिलेले दिसून येत आहे. याचा अर्थ लवकरच तुमच्या खात्यावर पैसे येतील असा होतो.
अशा पद्धतीने तपासा तुमच्या हपत्याचे स्टेटस
पीएम किसान च्या संकेतस्थळावर गेल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या फार्मर्स कॉर्नर वर क्लिक करा व त्यानंतर बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करून त्यानंतर एक पेज तुमच्यासमोर उघडेल. यामध्ये तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकावा व तुम्हाला तुमच्या स्टेटस चे संपूर्ण माहिती मिळेल.
लिस्टमध्ये नाव तपासायचे असेल तर असे तपासा…
- यासाठी तुम्ही सर्वप्रथम पीएम किसानच्याच्या अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.inला भेट द्यावी.
- त्यानंतर होम पेज वर फार्मर कॉर्नर वर क्लिक करावे.
- त्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाउन लिस्ट मधून राज्य, तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडावी लागेल.
- त्यानंतर गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर बेनिफिशरी लिस्ट दिसेल.या लिस्टमध्ये तुम्ही तुमच्या नाव तपासू शकतात.
Published on: 06 January 2022, 05:06 IST