पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी या योजनेच्या माध्यमातून दहावाहप्ता देशातील दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केला
त्यामुळे बऱ्याच लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हा पैसा जमा झाला परंतु असे बरेच शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यावर अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. असे शेतकरी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करून तक्रार दाखल करू शकतात.
या नंबर वर करू शकता कॉल
ज्या शेतकऱ्यांना हा पण त्याचे पैसे मिळाले नाहीत असे शेतकरी आवडतो पी एम किसान योजनेचा हेल्प डेस्क वर तक्रार दाखल करू शकतात. हेल्प टॅक्स आठवड्याच्या सोमवार ते शुक्रवार पर्यंत चालू असते. या आहेत काही टोल फ्री हेल्पलाईन नंबर
- पीएम किसान टोल फ्री नंबर-18001155266
- पी एम किसान हेल्पलाइन नंबर-155261
- पी एम किसान नवीन हेल्पलाइन-011-24300606,0120-6025109
- तसेच शेतकरी या ऑफिशियल संकेतस्थळावर देखील कंप्लेंट दाखल करू शकतात.
तुमच्या हप्त्याची स्टेटस जाणून घेण्यासाठी या नंबर वर कॉल करा
तुम्ही तुमच्या पी एम किसान योजनेच्या हप्त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी 011-23382401( डायरेक्ट हेल्पलाइन) या नंबर वर देखील कॉल करू शकता.
हप्ता न येण्याची काही कारणे
बऱ्याच लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे न जमा होण्याची कारणे असू शकतात त्यामध्ये योग्य कागदपत्र न देणे तसेच चुकीची माहिती नमूद करणे जसे की चुकीचा आधार नंबर,,खाते क्रमांक इत्यादी तसेच बरेच खातीही आधार नंबर सी-लिंक नसल्यामुळे देखील समस्या येऊ शकते. त्यासाठी तुम्ही या चुकी दुरुस्ती करण्यासाठी तुमच्या नजीकच्या कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन किंवा पी एम किसान हेल्प डेस्कची मदत घेऊ शकता.
Published on: 04 January 2022, 06:12 IST