लोकांच्या नजरेत भरेल, असे पार्ट बदलण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र, तुम्ही वाहनाचे सारेच सुटे भाग बदलू शकत नाही.‘अलॉय व्हील’ किंवा ‘लेदर सीट कव्हर्स’ असे छोटे बदल करण्यास हरकत नाही. मात्र, वाहनाचे असे काही पार्टस् आहेत, जे बदलण्याचा प्रयत्न केल्यास, वाहतूक पोलिस तुम्हाला जबर दंड ठोठावू शकतात.कार मॉडिफाय करताना, असे बदल केल्यास आता तुम्हाला
दंडाचीही (Traffice rules) तयारी ठेवावी लागणार आहे. कारमध्ये असे काही पार्टस् असतात, जे कधीच ‘मॉडिफाय’ करायचे नसतात. असे कोणते पार्टस् आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.‘हे’ पार्टस् कधीच बदलू नका.Never replace 'these' parts.काचेवर रंगीत फिल्म - अनेकांना आपल्या गाडीच्या काचांना रंगीत फिल्म लावण्याची हौस असते..मात्र, असं करणं, म्हणजे वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे.
कायद्यानुसार कारच्या मागील काचेसाठी किमान 75 टक्के दृश्यमानता, तर बाजूच्या काचांसाठी 50 टक्के दृश्यमानता असायला हवी.. केंद्र व राज्याच्या नियमांत काही बदल आहेत. काही ठिकाणी तर फिल्म लावण्यास सक्त मनाई आहे.कार सायलेन्सर -अनेकांना कारचा ‘शो-ऑफ’ करायला आवडते. त्यासाठी ते बाजारात मिळणारे ‘फॅन्सी सायलेन्सर’ गाडीला बसवितात. त्यामुळे त्यांच्या गाडीतून इतर गाड्यांपेक्षा वेगळा आवाज
निघतो. मात्र, असा आवाज ऐकल्यास वाहतूक पोलिस कान टवकारतात..असे फॅन्सी सायलेन्सर दिसल्यास दणकून चलान कापले जाते.फॅन्सी हॉर्न - ट्रक वा कारमध्ये बरेचदा विचित्र आवाजाचे ‘हॉर्न’ बसवले जातात. अशा कर्णकर्कश आवाजाचे, अचानक भीतीदायक वातावरण तयार होणाऱ्या हाॅर्नमुळे अपघाताची शक्यता असते. असं करणं बेकायदेशीर असून, गाडीला असा हाॅर्न लावल्याचे आढळून आल्यास, पोलिस तात्काळ चलन कापतात.
Published on: 13 August 2022, 01:54 IST