शेतकऱ्यांकडे कृषिपंपाची असलेली मोठ्या प्रमाणात थकबाकी हा एक महावितरणाचा डोकेदुखीचा विषय आहे. वर्षानुवर्षे शेतकऱ्यांकडे कृषिपंपाची थकबाकी आहे. शेतकऱ्यांनीही थकबाकी भरावी यासाठी महावितरण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणत असते.
अशीच एक संधी महावितरणने शेतकऱ्यांसाठी आणले आहे. राज्य शासनाच्या कृषी पंप विज जोडणी धोरण 2020 मधून वर्षानुवर्षे थकबाकीदार असलेल्या कृषी पंपाचे वीज बिल कोरे करण्याची संधी शेतकऱ्यांना चालून आली आहे.
या योजनेनुसार महावितरणकडून निर्लेखन तसेच विलंब आकार व व्याज आतील सवलतीचे पंधरा हजार 96 कोटी 66 लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. तसेच चालू वीजबिल आणि येत्या मार्च 2022 पर्यंत सुधारित थकबाकी पैकी जर शेतकऱ्यांनी 50 टक्के रकमेचा भरणा केला तर राज्यातील 44 लाख 50 हजार शेतकऱ्यांना तब्बल पंधरा हजार 353 कोटी 88 लाख रुपयांची माफी मिळणार आहे.त्यासोबतच थकित असलेले वीजबिलनील होणार आहे.
या वीज जोडणी धोरणाच्या माध्यमातून कृषी पंपाच्या थकीत असलेल्या वीजबिलांची पासून मुक्ती मिळावी यासाठी सुमारे 66 टक्के सूट देण्यात येत आहे.जर राज्याचा सप्टेंबर 2020 पर्यंत चा विचार केला तर 44 लाख 50 हजार 828 शेतकऱ्यांकडे 45 हजार आठशे चार कोटी रुपयांची थकबाकी होती. यामध्ये महावितरणने निर्लेखित केलेले दहा हजार चारशे 20 कोटी 65 लाख आणि त्यावरचा विलंब आकार व व्याजाचा मधून चार हजार 673 कोटी 1 लाख रुपयांची सूट अशी एकूण पंधरा हजार 96 कोटी 66 लाखांची रक्कम माफ करण्यात आली आहे. तसेच सोबतच वीज बिलांच्या दुरुस्ती मधून 266 कोटी 67 लाख रुपयांची रक्कम देखील समायोजित करण्यात आले आहे. त्यामुळे आता शेतकर्यांकडे 30 हजार 441 कोटी 75 लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे.
कृषी पंप थकबाकीदार शेतकऱ्यांनी चालू वीजबिल तसेच येत्या मार्च दोन हजार बावीस पर्यंतचे असलेली थकबाकीची पन्नास टक्के रक्कम भरली तर उर्वरित पन्नास टक्के म्हणजे पंधरा हजार 353 कोटी 88 लाख रुपये माफ होणार आहेत. या संधीचा लाभ घेतल्यास राज्यातील शेतकऱ्यांना वीज बिलांच्या थकबाकी मुक्तीसाठी 30 हजार 450 कोटी 56 लाख रुपयांची माफ मिळणार आहे. आतापर्यंत राज्यात 16 लाख 41 हजार 970 शेतकऱ्यांनी वीज बिल थकबाकी मुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदवला आहे. त्यांनी 945 कोटी 9 लाखांची चालू वीजबिल तसेच सुधारित थकबाकी पोटी 769 कोटी 56 लाख रुपयांचा भरणा केला आहे.
Published on: 14 December 2021, 10:29 IST