News

एक जानेवारी 2022, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी (Successful Prime Minister Hon'ble Shri Narendraji Modi) यांनी आपल्या करकमला द्वारे देशातील दहा कोटी 80 लाख शेतकऱ्यांना पीएम सन्मान निधी किसान योजनेचा (PM Sanman Nidhi Kisan Yojana) दहावा हप्ता वितरित केला. या योजनेला पात्र असलेल्या संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांसाठी सरकारने सुमारे 20 हजार कोटींहून अधिक निधी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पीएम किसान सम्मान निधि योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना एका वर्षात तीन हप्ते दिले जातात. प्रत्येक हप्ता हा दर चार महिन्यांनी येतो या योजनेचा एक हप्ता हा 2000 रुपयाचा असतो. या योजनेसाठी राज्यातील सुमारे 1 कोटी 5 लाख शेतकरी पात्र असल्याचे सांगितले जात आहे.

Updated on 03 January, 2022 9:01 AM IST

पीएम किसान सम्मान निधि योजनाच्या ऑफिशियल वेबसाईट नुसार(According to the official website), पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता हा एक डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. या योजनेचा दुसरा हप्ता हा एक एप्रिल ते 31 जुलै दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जातो तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनेचा  (ambitious) तिसरा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या दरम्यान जमा केला जातो. मात्र असे असले तरी मागील वर्षातील तिसरा हप्ता हा शेतकऱ्यांना वेळेवर मिळू शकला नव्हता, कारण की मध्यंतरी अनेक अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता.

सरकारी यंत्रणेला हा गैरप्रकार निदर्शनास येताच त्यांनी अपात्र शेतकऱ्यांवर कार्यवाही केली, हे अपात्र शेतकरी (Ineligible farmers) या योजनेतून कायमचे वगळण्यात आले शिवाय त्यांना दिला गेलेला निधी हा देखील वापस घेण्यात आला. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जे शेतकरी अपात्र ठरविण्यात आले आहेत त्या शेतकऱ्यांमध्ये सर्वात जास्त प्रमाण हे करदात्याचे आहे, आणि ही योजना करतात आता शेतकऱ्यांसाठी नाहीय. 1 जानेवारी 2022 रोजी माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी पीएम किसान सम्मान निधि योजनेचा दहावा हफ्ता तर हस्तांतरित केलाच याशिवाय त्यांनी नवीन वर्षात 351 शेतकरी उत्पादक संघटना यांना 14 कोटीहून अधिक इक्विटी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. या शेतकरी उत्पादक संघटनेद्वारे सुमारे सव्वालाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

पीएम किसान योजनेसंदर्भात तक्रार कुठे करणार

शेतकरी मित्रांनो जर आपणास पीएम किसान सम्मान निधि योजनेचा दहावा हफ्ता प्राप्त झाला नसेल, तर आपण याबाबत विचारपूस करू शकता, जर आपणास या विषयी तक्रार (Complaint) करायची असेल तर आपण पीएम किसान सम्मान निधि योजना यासाठी जारी केलेल्या 155261/ 011-24300606, 011-23381092 या हेल्पलाइन नंबरला फोन करू शकता. तसेच आपण pmkisan-mh@gov.in या ईमेल आयडीवर तक्रार देखील करू शकता. हा ई-मेल फक्त महाराष्ट्र राज्यासाठी जारी केला गेला आहे.

English Summary: if you didnt get 10th installment of pm kisan sanman nidhi yojna then complaint on this number
Published on: 03 January 2022, 09:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)