News

बरेचजण कष्ट करून पै पै जमा करून कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित म्हणून बँकेत ठेवतात. कारण बँकेबद्दल सगळ्यांना विश्वास असतो की आपले पैसे सुरक्षित आहेत. परंतु यामध्ये ही बरेच जणांना शंका असते की पैसे बँकेत ठेवावे की नाही. यामध्ये जे लोक पाच लाखांपेक्षा जास्त ठेव बँकेत ठेवण्याचा विचार करतात अशा लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण होतात.

Updated on 18 November, 2021 10:35 AM IST

बरेचजण कष्ट करून पै पै जमा करून कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित म्हणून बँकेत ठेवतात. कारण बँकेबद्दल सगळ्यांना विश्वास असतो की आपले पैसे सुरक्षित आहेत. परंतु यामध्ये ही बरेच जणांना शंका असते की पैसे बँकेत ठेवावे की नाही. यामध्ये जे लोक पाच लाखांपेक्षा जास्त ठेव बँकेत ठेवण्याचा विचार करतात अशा लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण होतात.

त्यामुळे बँकेत जास्त पैसे ठेवण्याबाबत असलेले बँकेचे नियम माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. या लेखात आपण या संबंधी माहिती घेऊ.

 अडचणीत असलेल्या बँकांना सरकार बुडू देत नाही:

या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाच लाखांपेक्षा जास्त पैसे बँकेत जमा करू नये असा कोणताही नियम नाही. एखादी बँकेचे जर दिवाळे निघाले तर नियमानुसार सरकारकडून पाच लाख रुपये पर्यंतचा रकमेची सुरक्षिततेची हमी दिली जाते. म्हणजेच बँक बुडाली किंवा डबघाईला आली तरी सुद्धा सरकार तुम्हाला तुमच्या पाच लाख रुपये देते.त्यामुळे बऱ्याच लोकांना वाटते की पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत ठेवू नये.

सरकार अडचणीत असलेल्या बँकांना मुदत देत नाही आणि ती मोठ्या बँकेत विलीन करते. बँक बंद पडल्यास सर्व खातेदारांना पेमेंट करण्यासाठी डीआयसीजीसी जबाबदार आहे. या रकमेची हमी देण्यासाठी डीआयसीजीसी बँकांकडून प्रीमियम आकारते.

 उत्पन्नाचा योग्य पुरावा ठेवणे आवश्यक

 तुम्ही तुमच्या बँक खात्यात तुम्हाला हवे तेवढे पैसे ठेवू शकतात. परंतु यामध्ये महत्त्वाचे की तुमच्याकडे तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोताचा पक्का पुरावा असायला हवा.म्हणजेच आयकर विभागाने या संबंधी विचार केला असता,पैसे कुठून आले हे सांगावे लागेल. तुम्ही नियमानुसार कर भरला आहे, तुमच्याकडे तुमच्या उत्पन्नाचा योग्य पुरावा असेल तर कोणतीही अडचण उद्भवत नाही. 

बँक खात्यात तुमच्याकडे जास्त पैसे असतील आणि त्या पैशाचा स्त्रोत इन्कम टॅक्स समोर तुम्ही सिद्ध करू शकत नसाल तर मात्र अडचणी निर्माण होतात. त्यासाठी तुमचे बँक खाते गोठवले देखील जाऊ शकते. इतकेच नाही तर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते. बचत खात्यामध्ये पैसे ठेवण्यापूर्वी नफा आणि तोटा याची काळजी घेतली गेली पाहिजे. कारण ठेवींवरील व्याज कमी आहे. त्यामुळे बचत खात्यात जास्त पैसे ठेवण्याऐवजी फिक्स डिपॉझिट करणे केव्हा हे पैसे मॅच्युअल फंडात गुंतवणे म्हणजे जास्त व्याज मिळेल असा अनेकांचा समज आहे. (संदर्भ- मी इ शेतकरी )

English Summary: if you deposited more money iin bank know about banking rule
Published on: 18 November 2021, 10:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)