सध्या व काही भाजीपाल्याचे दर चढे आहेत तर काही भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. त्यामुळेबरेच शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
त्यामुळे आपल्याला माहित आहेच की कमी पुरवठा होत असलेल्या भाजीपाल्याची मागणी वाढलेली असते व त्या दृष्टीने त्याला भाव देखील जास्त असतो. परंतुत्या तुलनेने पुरवठा जास्त व मागणी कमी असलेल्या भाजीपाल्याचा भाव हा कमी असतो.हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पुरवठा जास्त असलेल्या भाजीपाल्याला ग्राहक मिळत नाही व पर्यायाने असा भाजीपाला विकला न गेल्यामुळे पडून राहतो. सध्या टोमॅटो ची तीच गत आहे.
परंतु यावर गडहिंग्लज शेतीमाल खरेदी विक्री संघाने एकशेतकऱ्यांच्या फायद्याची अट घातली आहे. त्याला आपल्याला लिंकिंग असे देखील म्हणता येईल. जर दहा किलो मिरची खरेदी करायची असेल तर 40 किलो टोमॅटो घ्यावे लागतील अशी अट या खरेदी-विक्री संघाने घातली आहे.
त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. कारण विक्री अभावी पडून राहिलेला टोमॅटो विकला जात असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मागे काही महिन्याचा विचार केला तर भाजीपाल्याच्या भावामध्ये कायम चढ-उतार होत आहे. काही भाजीपाला उच्चांकी दराने विकले जात आहेत तर काही कवडीमोल दराने. ही परिस्थिती बर्याचश्या मार्केटमध्ये आहे.कमी भाव असलेला भाजीपाला विकणे म्हणजे एक जिकिरीचे काम आहे आणि जरी असा भाजीपाला विकला जरी गेला तरी तोटाच येतो. मागणी असलेला भाजीपाला जास्त दराने विकला जातो. हे साधारण प्रत्येक बाजारपेठेचे गणित आहे. हीच परिस्थिती गडहिंग्लज बाजार समितीच्या आवारात असणाऱ्या खरेदी-विक्री संघाच्या होणाऱ्या लिलावात असायची.
नक्की वाचा:Onion Rate : कांद्याला निच्चांकी भाव, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
यामध्ये हिरव्या मिरचीचे दर तेजीत आहेत तर टोमॅटोचे दर खूपच कमी आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेते हे हिरव्या मिरचीला जास्त पसंती देत होते.
आणि टोमॅटो मात्र विक्री अभावी पडून राहत होता. ही परिस्थिती संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला कीदहा किलो मिरची खरेदी करायची असेल तर 40 किलो टोमॅटो त्यासोबत द्यावे लागतील अशी अटच त्यांनी टाकली.त्यामुळे हिरवी मिरची आवश्यक असल्यामुळे संघाच्या या अटीमुळे विक्रेत्यांना टोमॅटोची खरेदी देखील करावी लागत आहे. त्यामुळे मिरची सोबत टोमॅटो देखील विकला जात असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे.( स्त्रोत-अग्रोवन)
Published on: 18 April 2022, 12:09 IST