ज्या लोकांचे एचडीएफसी बँकेत खाते असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोरोना काळात अनेकांचा व्यवसायावर परिणाम झाला आहे. शेतकरी असो किंवा व्यावसायिक सर्वांना कोरोना आजाराचा फटका बसला आहे. अशा पडतीच्या काळात दुकानदारांसाठी खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेने एक जबरदस्त ऑफर आणली आहे.
तुम्हाला व्यवसायासाठी रोखीची गरज असेल तर कोणत्याही प्रुफशिवाय तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील. याकरता तुम्हाला सहा महिन्यांचं बँक स्टेटमेंट (Bank Statement) दाखवावे लागेल. बँकेने ही सेवा छोट्या रिटेलर्सना लक्षात घेऊन आणली आहे. या खास सुविधेसाठी बँकेने सीएससी एसपीव्हीसह पार्टनरशीप केली आहे. बँकेने या सुविधेला दुकानदार ओव्हरड्राफ्ट स्कीम (Dukandar Overdraft Scheme) असे नाव दिले आहे. या सुविधेचे फायदा आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्यांना होणार आहे.
कोणत्या ग्राहकांना मिळेल फायदा?
दुकानदार ओव्हरड्राफ्ट स्कीमचा फायदा त्या रिटेलर्सना (Retailers) मिळेल, ज्यांचा व्यवसाय कमीतकमी गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. या सुविधेअंतर्गत तुम्ही कमीतकमी 50 हजार तर जास्तीत जास्त 10 लाख रुपयांच्या रोख रक्कम मिळवू शकता. बँकेने असं म्हटलं आहे की रिटेलर्स, दुकानदार आणि ग्रामीण भागातील उद्योजक या स्कीमचा फायदा घेऊ शकतात.
या स्कीममधील सर्वात चांगली बाब म्हणजे, ग्राहकांना कोणतीही गोष्ट तारण म्हणून किंवा सिक्युरिटी अथवा गॅरंटी म्हणून बँकेत ठेवावी लागणार नाही. शिवाय या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी बिझनेस फायनान्शिअल किंवा इन्कम टॅक्स रिटर्नची आवश्यकता नाही.
कमी पेपपरवर्कची आवश्यकता
आणखी महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेसाठी मोठ्या पेपरवर्कची अर्थात काही अतिरिक्त कागदपत्रांचीही आवश्यकता नाही. कमीत कमी वेळेत ग्राहकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याचा बँकेचा मानस आहे.
कुणाला किती मिळेल ओव्हरड्राफ्ट?
सहा वर्षांपासून कमी कालावधीसाठी व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना 7.5 लाख रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळेल
जे ग्राहक सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी व्यवसाय करत आहेत त्यांना दहा लाखाची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळेल
बँकेच्या 600 पेक्षा जास्त शाखा आणि व्हर्च्युअल रिलेशनशीप मॅनेजमेंट सपोर्ट करतील
Published on: 28 July 2021, 05:51 IST