News

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कोरोना काळात सर्वकाही ठप्प झाल्याचे भाव कमी झाले होते. तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. असे असताना आता एका शेतकऱ्याचे पत्र चांगलेच व्हायरल होत आहे.

Updated on 09 March, 2022 1:55 PM IST

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कोरोना काळात सर्वकाही ठप्प झाल्याचे भाव कमी झाले होते. तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. असे असताना आता एका शेतकऱ्याचे पत्र चांगलेच व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री साहेब मागील वर्षापासून उत्पन्न होत नसल्याने शेती परवडत नाही म्हणून किराणा दुकानात वाईन विकायची परवानगी दिली न तशीच परवानगी आम्हालाही द्या, मागणी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे.

या शेतकऱ्याने असे मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. जयगुनाथ गाढवे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याच्या या अजब मागणीची चर्चा राज्यात सुरु आहे. यामुळे खरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जयगुनाथ गाढवे यांच्या पत्राची दखल घेणार का? अशी चर्चा सध्या सुरु आहे. तसेच सरकार झालेल्या नुकसानीची भरपाई देईल हे पाहावे लागेल. भंडारामध्ये मोहाडी तालुक्यातील निलज बु. या गावात जयगुनाथ गाढवे हे राहतात. याठिकाणी गेल्यावर्षी चक्रीवादळ आले होते. त्यात जयगुनाथ यांच्यासह गावातील अनेक शेतकऱ्यांची धानाची शेती भुईसपाट झाली होती. यामुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते.

दरम्यान, पंचनामे झाले तरी एवढे दिवस लोटूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई मिळालेली नाही. यामुळे शेतकरी संतापले आहेत. गावातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांसमोर कैफियत मांडून तातडीने नुकसान भरपाईची देण्याची मागणी केली. परंतु यावर सरकारने अजूनही कोणताही तोडगा काढलेला नाही. यामुळे मदत मिळणार की नाही असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

शेतात पीक घेताना लागत असलेले खत, युरिया आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यात ताळमेळ बसत नाही. तर दुसरीकडे मुलांचा शैक्षणिक खर्च, कुटुंबाच्या आरोग्यावर होणारा खर्च हे सर्व शेतीच्या उत्पन्नामधून करणे शक्य होत नाही. पदरचे पैसे शेतीसाठी घालावे लागत आहेत. यामुळे नाराज झालेले जयगुनाथ गाढवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये ते म्हणाले, मुख्यमंत्री साहेब आपण किराणा दुकानात वाईन विकायची परवानगी दिली तशी मलाही कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लवकरात लवकर वाईन विक्रीची परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

English Summary: 'If wine is not alcohol then allow sale, at present agriculture is unaffordable due to low income'
Published on: 09 March 2022, 01:54 IST