News

संग्रामपुर/ महसुली रचनेनुसार तालुक्याच्या अतिवृष्टी झाली

Updated on 30 July, 2022 9:08 PM IST

संग्रामपुर/ महसुली रचनेनुसार तालुक्याच्या अतिवृष्टी झाली पंधरवाडा उलटला पण नुकसान भरपाईचा पत्ता नाही, प्रशासन धिमे तर एकही लोकप्रतिनिधी ब्र शब्द बोलण्यास तयार नाही, अशी एकूण परिस्थिती असल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पातुर्डा येथे शपथ एल्गार घेतला, यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती, हेक्टरी ५० हजार रुपये शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या अशी मागणी

स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी यावेळी बोलतांना केली,Prashant Dikkar, Vidarbha President of Swabhimani, while speaking on this occasion said, पातुर्डा कवठळ संग्रामपूर या ३ महसूल मंडळात अतिवृष्टी होऊन तूर कापूस सोयाबीन पीक हातचे गेले सततच्या पावसामुळे शेत पाण्याने तुडुंब भरलेले असतांना, त्याच जलाशयात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पाण्यात बसून दिवसभर आंदोलन केले, यात ८ ते १० कार्यकर्ते चार दिवस आजारी पडले या शेतकऱ्यांच्या समस्येकडे

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानीने लक्षवेधी आंदोलन केले. आणि आपले आमदार खासदार तर सत्तेच्या राजकारणात एवढे गुंग आहेत की त्यांनी साधी एक भेट सुद्धा या शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या शेत शिवाराला दिली नाही, सत्ता स्थापनेच्या खेळात फुटीर आमदाराला ५० कोटी मिळण्याची चर्चा खरी वाटत असतांना या शेतकऱ्यांना साधी नुकसान

भरपाई सुद्धा नाही, म्हणूनच शेतकरी आक्रमक झाले व या शेतकऱ्यांच्या पाठीशी स्वाभिमानी ठामपणे कायमस्वरूपी उभी आहे. असे आश्वासन विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी यावेळी बोलतांना दिले, पावसाची उघडी असल्याने शेतीच्या मशागतीची धांदल घाई असून आज ३० जुलै रोजी दुपारी १२ वाजता झालेला शपथ एल्गार कार्यक्रमात शेतकरी

बहुसंख्येने सहभागी झाले होते, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या तसेच ओला दुष्काळी मदतीच्या सुविधा शेतकऱ्यांना द्या, अशी मागणी प्रशासनाच्या वतीने शपथ विधी कार्यक्रमाला उपस्थित असलेले नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे यांच्या मार्फत सरकारकडे यावेळी करण्यात आली. शासन प्रशासनाने स्वाभिमानीच्या मागणीची दखल न

घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करु असा इशारा यावेळी देण्यात आला, यावेळी स्वाभिमानीचे नेते मोहन पाटील, उज्वल चोपडे, जिल्हाध्यक्ष अनंता मानकर, खंडेराव,विजय ठाकरे, सुनिल तायडे,विठ्ठल वखारे, गोपाल तायडे , दत्ता डिक्कर, गणेश इंगळे, विनोद झाडोकार, विलास इंगळे, शिवा वरटकार, यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते..

English Summary: If we don't get help for crop damage, we will strongly protest! Prashant Dikkar
Published on: 30 July 2022, 09:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)