News

बगहा येथील मंगळपूर दियारा ते मधुबनीपर्यंत सुमारे १२ ते १३ किमी नदीकाठावर कलिंगडाची लागवड करण्यात आली आहे. या भागात केल्या जाणाऱ्या कलिंगडाच्या शेतीला इतकी मागणी आहे की त्यातून शेतकरी दीड कोटी रुपयांची कमाई करत आहेत.

Updated on 28 April, 2022 2:37 PM IST

शेतातील उत्पन्न अधिकाधिक येण्यासाठी शेतकरी अमाप कष्ट घेत असतात. त्यांच्या या कष्टाचं गोड फळ त्यांना मिळतेच. असाच एक प्रसंग घडला आहे बिहार राज्यात. बिहार राज्याच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बगहा येथील गंडक नदीकाठच्या दियारा परिसरातील शेतकरी कलिंगडाची शेती करून आपला उदरनिर्वाह करत असतात. या भागात जवळजवळ दहा हजार शेतकरी शेती करत असून सर्व शेतकऱ्यांनी कलिंगडाची शेती केली आहे.

कलिंगड या फळाला सध्या देश विदेशातून बरीच मागणी आहे. बगहा येथील मंगळपूर दियारा ते मधुबनीपर्यंत सुमारे १२ ते १३ किमी नदीकाठावर कलिंगडाची लागवड करण्यात आली आहे. या भागात केल्या जाणाऱ्या कलिंगडाच्या शेतीला इतकी मागणी आहे की त्यातून शेतकरी दीड कोटी रुपयांची कमाई करत आहेत. देशातील विविध बाजार समित्यांमध्ये या भागातून दररोज १२ ते १५ हजार क्विंटल कलिंगड हे विक्रीसाठी पाठवले जातात.

सध्या बाजारात कलिंगडाला १० रुपये प्रतिकिलो असा भाव आहे. या परिसरातून बिहारमधील विविध बाजार समितीमध्ये कलिंगड पाठवले जाते. शिवाय नेपाळ, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये देखील कलिंगडाची निर्यात केली जात आहे. असं असलं तरी मागील दोन वर्षे कोरोनाच्या काळात कलिंगड विक्रीवर बराच परिणाम झाला. यातून त्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला होता. कोरोनाच्या काळात बरेच निर्बंध असल्यामुळे कलिंगड हे २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकले जात होते. यंदा मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे व्यापारी एक हजार रुपये क्विंटल या दराने कलिंगड खरेदी करत आहेत.

शास्त्रीनगर, पुरहाऊस, कैलाश नगर, गोदियापट्टी, रामधाम मंदिर, मालपुरवा, नारायणपूर, राजवातिया, रतवाल, धान्हा इत्यादी ठिकाणी कलिंगडाचे वजन केले जाते याशिवाय विवेक धर्मकाटा चौतारावा, साई गुरू धर्मकाटा मालपुरवा, मधुबनी येथे स्थित धर्मकाटा या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात कलिंगडाचे वजन केले जाते. तसेच छोटे शेतकरीसुद्धा शेतात दीड ते दोन क्विंटल वजनाचे यंत्र लावून कलिगंड विकत आहेत. यामुळे दररोज सुमारे १२ ते १५ हजार क्विंटल कलिंगड विकले जात आहे.

कलिंगडाचा हा व्यवसाय सुमारे ४५ दिवस चालतो. कलिंगड या फळाची लागवड करताना तेथील शेतकरी रासायनिक खतांचा वापर करणे टाळतात. या फळलागवडीसाठी शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे कलिंगडाचा गोडवा पण अधिक असतो. सेंद्रिय खतांचा वापर केल्याने हे फळपीक बराच काळ चांगले राहते. जवळजवळ १० ते १२ दिवस हे फळ खराब होत नसल्याचं व्यापाऱ्यांच म्हणणं आहे. त्यामुळे इतर देशातसुद्धा याला बरीच मागणी आहे शिवाय हे फळ जास्त काळ टिकणारे असल्यामुळे याची निर्यात करणं देखील सोपं जात.

महत्वाच्या बातम्या;
आमदार सदाभाऊ खोत यांचा 'जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा' या अभियानाला उद्यापासून सुरुवात; म्हणाले...
तरुण शेतकऱ्याची यशोगाथा; इस्राईल तंत्रज्ञान पद्धतीने केली शेती
कृषी कृषीपंपासाठी केली वीज चोरी;सहा शेतकऱ्यांवर झाली दंडात्मक कारवाई

English Summary: If there is farm then there is power! Billions of rupees are earned from the sale of these fruits
Published on: 28 April 2022, 02:37 IST