कष्टाने पिकवलेला शेतीमाल शेतकरी बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी नेतात. शेतीमाल विक्री केल्यानंतर देखील व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करून देखील वेळेवर पैसे देत नाही किंवा त्यात तातडी दाखवत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते परंतु आता व्यापाऱ्यांना सदर प्रकार करता येणार नाही. तसे पाहायला गेले तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचे पैसे ताबडतोब देणे व्यापाऱ्यांना बंधनकारक आहे. याच अनुषंगाने आता या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आदेश राज्याचे पणन संचालक शैलेश कोतमीरे यांनी दिले आहेत.
पणन संचालकांनी दिले हे आदेश
शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल विकल्यानंतर त्यांना तातडीने पैसे द्यावे व व्यापाऱ्यांनी जर तसे केले नाही तर संबंधित व्यापाऱ्यावर आता कारवाई करण्याचेच आदेश राज्याचे पणन संचालक शैलेश कोतमीर यांनी दिले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचे पैसे व्यापाऱ्यांना अगदी वेळेवर देणे गरजेचे आहे. नाहीतर पणन संचालनालयाच्या माध्यमातून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
यामध्ये महत्त्वाचे असे आहे की शेतीमाल व्यापाऱ्यांनी खरेदी केला व तो खरेदी केल्यानंतर मालाचे वजन झाल्यानंतर भावाप्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे लगेच देणे व्यापाऱ्यांना बंधनकारक करण्याचा आदेश पणन संचालकाकडून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बऱ्याचदा बाजारभावात घसरण झाल्यामुळे आधीच फटका बसतो व त्यातही पैसे वेळेवर जर मिळाले नाही तर शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
या अनुषंगाने या घटनेचे गांभीर्य ओळखून पणन संचालकांनी अशा व्यापाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. यामध्ये आता जर माल खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांच्या हिशोबवहीची तपासणी केली जाणार आहे व यामध्ये जर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे देण्याला टाळाटाळ केली तर व्यापाऱ्यांची बँकेमध्ये जी काही डिपॉझिट असते त्यामधून पैसे देण्यात येणार आहेत किंवा दुसरी बाब म्हणजे ज्या बँकेने संबंधित व्यापाऱ्याचे हमी दिली आहे अशा बँकेकडून शेतकऱ्यांना पैसे देण्याची कायद्यात तरतूद आहे.
यामध्ये पणन संचालकांचा जो काही आदेश आहे त्यानुसार बाजार समितीमध्ये शेतीमालाचे लिलाव झाल्यास व्यापाऱ्यांच्या खरेदी आणि विक्री सह विक्री दराची माहिती घेण्याचे काम हे बाजार समितीचे असल्याचे देखील यामध्ये नमूद करण्यात आला आहे व या माध्यमातून ज्या व्यापाऱ्यांनी सदर नियमांचे पालन केले नसेल तर त्यावर कारवाई करण्याचा उल्लेख आहे.
Published on: 12 August 2023, 09:21 IST