News

निसर्गाच्या अनियमितपणामुळे पीक नुकसान मोठ्या प्रमाणात झाली आहे जो की सगळीकडे याचा गाजावाजा होत आहे मात्र नुकसानभरपाईसाठी जे प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. योग्य वेळेत प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. खरीप हंगामाचे नुकसान झालेच मात्र आता अवकाळी पाऊसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई पाहिजे असेल तर योग्य वेळेत प्रक्रिया करावी तरच मदत मिळेल असे कृषी संचालकांनी सांगितले आहे. राज्यातील ६ विमा कंपन्या तसेच जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयांना पत्र पाठवून याबाबत प्रक्रिया पूर्ण करावी असे सांगितले आहे.

Updated on 04 January, 2022 4:12 PM IST

शेतकऱ्यांकडे पूर्वसूचना दाखल करण्यासाठी 6 पर्यांय :-

शेतकऱ्यांनी त्यांना झालेल्या नुकसानीची कल्पना संबंधित विभागाला दिली तर त्यांना मदत मिळण्यास काही अडचणी येणार नाहीत. शेतकऱ्यांसमोर त्यासाठी ६ पर्याय खुले करण्यात आले आहेत. या पर्यायात क्रॅाप इन्शुरन्स अॅप (Crop Insurance https#//play.google.com/store/apps/details?) या लिंक वर भेटते. क्रॅाप इन्शुरन्स अॅप तुम्ही फोनमध्ये इन्स्टॉल करून त्यामध्ये जी माहिती विचारली आहे ती अचूकपणे भरावी. तसेच विमा कंपनीचा 1800 2660 700 या टोल फ्री क्रमांकावर पूर्व सूचना देणार आहेत. विमा कंपनीच्या pmfby.gov.in या ई-मेल वर सुद्धा सूचना करता येणार आहेत. ज्या बँकेत तुम्ही विमा जमा केला आहे त्या बँक शाखेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

रब्बी हंगामातील या पिकांचे नुकसान :-

यंदा उशिरा का होईना मात्र हंगामातील पिकांच्या वाढीचा जोर दाखवला आहे. परंतु पुन्हा निसर्गाचा लहरीपणा जसे की अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण झाल्यामुळे हरभरा पिकावर घाटीअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला खरीप हंगामातील अंतिम टप्प्यात असणारे कापूस आणि तुरीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. कापूस पिकाचे बोंडे गळून पडल्याने शेतकरी संकटात आहेत. नुकसानभरपाई पाहिजे असेल तर योग्य वेळेत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी असे कृषी संचालक विकास पाटील यांनी सांगितले आहे.

जनजागृतीही महत्वाची :-

शेतकऱ्यांना माहिती नसल्याने नुकसानभरपाई पासून वंचित राहत आहेत. पीक नुकसानीच्या पूर्व सूचना देण्यासाठी गावोगावी जनजागृती करणे गरजेचे आहे. तसेच सोशल मिडियाचा वापर करून सुद्धा हा संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहचवला पाहिजे. नुकसान झाल्यानंतर अवघ्या ७२ तासाच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी तरच मदत मिळणार आहे.

English Summary: If farmers want compensation, process it in a timely manner, says the Director of Agriculture
Published on: 04 January 2022, 04:12 IST