News

शेतकरी सध्या अनेक कारणांनी अडचणीत आला आहे. असे असताना अचानक देखील त्यांच्यावर अनेक संकटे येतात. यामध्ये आता उसाचा गाळप हंगाम सुरु असून महावितरणच्या काही चुकांमुळे शेतकऱ्यांचे ऊस जळाल्याच्या अनेक घटना घडत असतात. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

Updated on 13 March, 2022 2:02 PM IST

शेतकरी सध्या अनेक कारणांनी अडचणीत आला आहे. असे असताना अचानक देखील त्यांच्यावर अनेक संकटे येतात. यामध्ये आता उसाचा गाळप हंगाम सुरु असून महावितरणच्या काही चुकांमुळे शेतकऱ्यांचे ऊस जळाल्याच्या अनेक घटना घडत असतात. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. असे असताना यामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळू शकते. महावितरणच्या गलथान कारभारामुळे ऊस जळाला असेल तर शेतकऱ्याला महावितरणच्या विभागीय कार्यालयात संबंधित कागदपत्रे अर्जासोबत जमा करावी लागतात. याबाबत अनेक शेतकऱ्यांना माहिती देखील नाही.

यामध्ये मागील तीन वर्षाचा सातबारा उतारा, महसूल विभागाचा आणि पोलीसांनी केलेला पंचनामा, किती क्षेत्रावरील ऊस जळाला आहे त्याचे फोटो, तसेच यामध्ये ऊसाबरोबरच त्या क्षेत्रातील ठिंबक किंवा पाणीपुरवठा करणारे इतर साहित्य हे या घटनेत जळाले असेल तर त्याचे बील. तर साखर कारखान्यांची मागच्या तीन वर्षांची बीलंही अर्जासोबत जोडावी लागणार आहेत. यामुळे याबाबत शेतकऱ्यांना मदत मिळू शकते. ऊस गाळपाचा हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे.

अनेक शेतकऱ्यांचे ऊस लागवड करुन 15 महिने उलटले तरी तोड झालेली नाही. त्यामुळे उत्पादनात तर घट झाली आहे. यातच ऊसाला आग लागण्याच्या घटना वाढल्या असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक असले तरी हेच नुकासनीचे ठरत आहे. हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही 15 ते 20 टक्के ऊसतोड शिल्लक आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.

ऊस गाळपाचे टेन्शन असताना महावितरणच्या अनेक गोष्टींमुळे अनेकदा उसाला आग लागत आहे. यामुळे महावितरण आपल्याकडून सक्तीची वसुली करत असताना मात्र त्यांच्याकडून चूक झाली तर त्याची मदत शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी शेतकरी करतात. बिले भरली नाहीत, तर लाइट बंद करण्याचा कारभार सध्या सुरु आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

English Summary: If farmers get burnt due to MSEDCL management, get financial help
Published on: 13 March 2022, 02:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)