केंद्र सरकार शेतकरी आंदोलकांची अवहेलना करीत आहे. तसेच अन्य भाजप नेत्यांकडून शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे. मात्र काँग्रेसची सत्ता आल्यास नवीन कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केली. उत्तर प्रदेशातील सहासरनपूर येथे किसान महापंचायतीने आयोजित केलेल्या रॅलीला प्रियांका गांधी यांनी संबोधित केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
केंद्र सरकारने लादलेले तीनही कृषी कायदे राक्षसासारखे आहे. त्यामुळे काँग्रेस शेतकरी कामगारांच्या सोबत आहे. तीनही कायदे रद्द करण्यासाठी काँग्रेस विरोध चालूच ठेवणार आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक होणार आहे. तत्पुर्वी शेतकऱ्यांची ही पहिली बैठक पक्षातर्फे घेण्यात आली आहे. रॅलीच्या पूर्वी गांधी यांनी सहारनपूर येथील शांकभरी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
तसेच पुजा-अर्जा केली. त्याचबरोबर राजकारणामध्ये यश मिळू दे, असे साकडे घातले. त्यांनी रायपूर गावातील खानकाह येथील हजरत रायपूरी दर्ग्याला भेट दिली. त्यानंतर त्यांनी किसान महापंचायतीला संबोधति केले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचेय उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष कुमार लल्लू आणि काँग्रेस नेता इमरान मसूद उपस्थित होते.
Published on: 11 February 2021, 09:15 IST