News

आयसीएल (ICL) या जागतिक कृषी- खतनिविष्ठा पुरवणाऱ्या अग्रगण्य कंपनीने आज महाराष्ट्रातील सुपा, अहिल्यानगर येथे आपल्या अत्याधुनिक स्पेशॅलिटी फर्टिलायझर (नाविन्यपूर्ण) उत्पादन प्रकल्पाचे भव्य उद्घाटन केले. सदर प्रकल्पाच्या माध्यमातून कंपनीने भारतातील आपली उपस्थिती अधिक मजबूत करताना शाश्वत शेतीसाठी विद्राव्य खतांचे घरेलू उत्पादन करून यामध्ये महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

Updated on 08 May, 2026 2:06 PM IST

आयसीएल (ICL) या जागतिक कृषी- खतनिविष्ठा पुरवणाऱ्या अग्रगण्य कंपनीने आज महाराष्ट्रातील सुपा, अहिल्यानगर येथे आपल्या अत्याधुनिक स्पेशॅलिटी फर्टिलायझर (नाविन्यपूर्ण) उत्पादन प्रकल्पाचे भव्य उद्घाटन केले. सदर प्रकल्पाच्या माध्यमातून कंपनीने भारतातील आपली उपस्थिती अधिक मजबूत करताना शाश्वत शेतीसाठी विद्राव्य खतांचे घरेलू उत्पादन करून यामध्ये महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

जागतिक स्तरावर खतांच्या उपलब्धतेवर विविध अडथळे निर्माण होत असताना, या प्रकल्पाद्वारे अत्याधुनिक विद्राव्य खतांचे घरेलू उत्पादन शक्य होणार असून, खतआयातअवलंबित्व कमी होऊन शेतकऱ्यांना सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह पुरवठा सुनिश्चित केला जाणार आहे. इस्रायलच्या या प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक कौशल्य यांचा प्रभावी संगम साधण्यात आला आहे, ज्यामुळे पिकांना गरजेनुसार खतांची, उच्च कार्यक्षमता आणि शाश्वत शेती पद्धतींना चालना मिळणार आहे.

या प्रसंगी बोलताना, ICL ग्रोईंग सोल्यूशन्स विभागाचे अध्यक्ष श्री. निर इलानी म्हणाले, “भारतामध्ये हा उत्पादन प्रकल्प उभारणे हे आमच्या नाविन्यपूर्ण खते व्यवसायाच्या विस्तारासाठी एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक पाऊल आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी सुसंगत हा प्रकल्प शेतकऱ्यांना उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि ICL च्या भविष्यातील वाटचालीस गती देईल.”

ICL ग्रोईंग सोल्यूशन्सचे उपाध्यक्ष श्री. एली अमोन यांनी नमूद केले, “महाराष्ट्रातील या विद्राव्य खत प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही स्थानिक खत उपलब्धता आणि विद्राव्य खत निर्माता पुरवठा साखळी मजबूत करत आहोत. यामुळे शेतकऱ्यांना अधिक सहज आणि जलद विद्राव्य खताची उपलब्धता होऊन, शाश्वत शेतीच्या दृष्टीने आमची वचनबद्धता अधिक दृढ होईल.”

ICL ग्रोईंग सोल्यूशन्स इंडिया चे मुख्य व्यवस्थापक भारत श्री. अनंत कुलकर्णी यांनी सांगितले, “खतांची कार्यक्षमता आणि 4R अनुसार योग्य ( खत, प्रमाण, वेळ, पद्धत) हा शाश्वत शेतीचा मुळगाभा आहे. ड्रिपद्वारे आणि फवारणीच्या माध्यमातून वापरता येणाऱ्या नाविन्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती आम्ही करत आहोत. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत उभारलेला हा विद्राव्य खते NPK प्रकल्प आमच्या पुढील प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे.”

या उद्घाटन सोहळ्यास आयसीएलचे वरिष्ठ अधिकारी, वितरक, व्यावसायिक भागीदार तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील मूल्यसाखळी अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

ICL भारतातील शेतकऱ्यांसोबत भविष्यातील भागीदारी निर्माण करण्यास, तंत्रज्ञानाधारित उत्पादने उपलब्ध करून देण्यास आणि कृषी क्षेत्रात शाश्वततेला चालना देण्यास कटिबद्ध आहे.

English Summary: ICL Inaugurates State-of-the-Art Water-Soluble Fertilizer (NPK) Manufacturing Plant in Maharashtra
Published on: 08 May 2026, 02:06 IST