News

देशातील सवसाधारण विमा क्षेत्रात आघाडीची कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कॉपोरेशनने 31 मार्च 2021 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात चमकदार कामगिरी केली आहे. या काळात कंपनीचा करोत्तर नफा 23.4 टक्क्यांनी वाढून 14 अब्ज 73 कोटी रुपयांवर पोहचला आहे. 2020 मध्ये हा नफा 11 अब्ज 94 कोटी रुपये होता. ढोबळ थेट प्रिमीयम उत्पन्न ( जीडीपीआय) 2021 या आर्थिक वर्षात 140 अब्ज 3 कोटी रुपयांवर गेले असून 2020 च्या तुलनेत त्यात 5.2 टक्के वाढ.

Updated on 28 April, 2021 6:31 AM IST

2020 मध्ये  हेच उत्पन्न 133 अब्ज 13 कोटी रुपये होते. जीडीपीआय 2021 च्या चौथ्या तिमाहीत 34 अब्ज 78 कोटी रुपये असून त्यात 2020 च्या चौथ्या तिमाहीतील 31 अब्ज 81 कोटी रुपयांच्या तुलनेत 9.4 टक्के वाढ झाली आहे. सर्वसाधारण विमा उद्योगासाठी चौथ्या तिमाहीतील वाढ ही 14 टक्के एवढी होती. संयुक्त गुणोत्तर संपुर्ण आर्थिक वषासाठी 99.8 टक्के एवढे नोंदविले गेले, तर 2020 साठी हेच गुणोत्तर हे 100.4 टक्के एवढे होते. संयुक्त गुणोत्तर चौथ्या तिमाहीसाठी 101. 8 टक्के एवढे नोंदविले गेले, तर 2020 च्या चौथ्या तिमाहीसाठी हेच गुणोत्तर हे 100.1 टक्के एवढे होते.

करपुर्व नफा 2021 मध्ये 15.1 टक्क्यांनी वाढून 19 अब्ज 54 कोटी रुपयांवर झेपावला आहे. हाच नफा 2020 या आर्थिक वर्षात 16 अब्ज 97 कोटी रुपये होता. चौथ्या तिमाहीसाठी 2021 मध्ये हा नफा 21.4 टक्क्यांनी वाढून चार अब्ज 50 कोटी रुपयांवर गेला. 2020 च्या चौथ्या तिमाहीत हा नफा तीन अब्ज 71 कोटी रुपये होता.  भांडवली नफा 2021 मध्ये तीन अब्ज 59 कोटी रुपयांवर गेला आहे. 2020 मध्ये हा नफा एक अब्ज 99 कोटी रुपये होता. 2021 च्या चौथ्या तिमाहीसाठी भांडवली नफा 0.66 अब्ज रुपये होता.

2020 च्या चौथ्या तिमाहीत हा नफा 0.95 अब्ज रुपये होता. करोत्तर नफा 2021 मध्ये 23.4 टक्क्यांनी वाढून 14 अब्ज 73 कोटी रुपयांवर झेपावला आहे. 2020 मध्ये हा नफा 11 अब्ज 94 कोटी रुपये होता. यंदाच्या चौथ्या तिमाहीसाठी करोत्तर नफा 22. 6 टक्क्यांनी वाढून तीन अब्ज 46 कोटी रुपयांवर गेला आहे.

English Summary: ICICI Lombard General Insurance's Q4 profit rises 23.4%
Published on: 28 April 2021, 06:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)