आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सचा चौथ्या तिमाहीत २३.४ टक्क्यांनी वाढला नफा

28 April 2021 06:26 AM By: भरत भास्कर जाधव
आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स

देशातील सवसाधारण विमा क्षेत्रात आघाडीची कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कॉपोरेशनने 31 मार्च 2021 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात चमकदार कामगिरी केली आहे. या काळात कंपनीचा  करोत्तर नफा 23.4 टक्क्यांनी वाढून 14 अब्ज 73 कोटी रुपयांवर पोहचला आहे. 2020 मध्ये हा नफा 11 अब्ज 94 कोटी रुपये होता. ढोबळ थेट प्रिमीयम उत्पन्न ( जीडीपीआय) 2021 या आर्थिक वर्षात 140 अब्ज 3 कोटी रुपयांवर गेले असून 2020 च्या तुलनेत त्यात 5.2 टक्के वाढ.

 

2020 मध्ये  हेच उत्पन्न 133 अब्ज 13 कोटी रुपये होते. जीडीपीआय 2021 च्या चौथ्या तिमाहीत 34 अब्ज 78 कोटी रुपये असून त्यात 2020 च्या चौथ्या तिमाहीतील 31 अब्ज 81 कोटी रुपयांच्या तुलनेत 9.4 टक्के वाढ झाली आहे. सर्वसाधारण विमा उद्योगासाठी चौथ्या तिमाहीतील वाढ ही 14 टक्के एवढी होती. संयुक्त गुणोत्तर संपुर्ण आर्थिक वषासाठी 99.8 टक्के एवढे नोंदविले गेले, तर 2020 साठी हेच गुणोत्तर हे 100.4 टक्के एवढे होते. संयुक्त गुणोत्तर चौथ्या तिमाहीसाठी 101. 8 टक्के एवढे नोंदविले गेले, तर 2020 च्या चौथ्या तिमाहीसाठी हेच गुणोत्तर हे 100.1 टक्के एवढे होते.

करपुर्व नफा 2021 मध्ये 15.1 टक्क्यांनी वाढून 19 अब्ज 54 कोटी रुपयांवर झेपावला आहे. हाच नफा 2020 या आर्थिक वर्षात 16 अब्ज 97 कोटी रुपये होता. चौथ्या तिमाहीसाठी 2021 मध्ये हा नफा 21.4 टक्क्यांनी वाढून चार अब्ज 50 कोटी रुपयांवर गेला. 2020 च्या चौथ्या तिमाहीत हा नफा तीन अब्ज 71 कोटी रुपये होता.  भांडवली नफा 2021 मध्ये तीन अब्ज 59 कोटी रुपयांवर गेला आहे. 2020 मध्ये हा नफा एक अब्ज 99 कोटी रुपये होता. 2021 च्या चौथ्या तिमाहीसाठी भांडवली नफा 0.66 अब्ज रुपये होता.

 

2020 च्या चौथ्या तिमाहीत हा नफा 0.95 अब्ज रुपये होता. करोत्तर नफा 2021 मध्ये 23.4 टक्क्यांनी वाढून 14 अब्ज 73 कोटी रुपयांवर झेपावला आहे. 2020 मध्ये हा नफा 11 अब्ज 94 कोटी रुपये होता. यंदाच्या चौथ्या तिमाहीसाठी करोत्तर नफा 22. 6 टक्क्यांनी वाढून तीन अब्ज 46 कोटी रुपयांवर गेला आहे.

ICICI Lombard General Insurance's आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स
English Summary: ICICI Lombard General Insurance's Q4 profit rises 23.4%

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.